मोठा वाघोदा ग्रा.प मध्ये “नया भिडू नया राज “
मोठा वाघोदा ता रावेर प्रतिनिधी-मुबारक तडवी
येथील ग्रामविकास अधिकारी गौतम आधार वाडे यांची साकेगांव ता भुसावळ येथे बदली होवुन खिर्डी ता रावेर येथील श्री जयकार यांची येथील ग्रामपंचायती त नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांनी नुकताच ग्रा.प चा पदभार स्वीकारला त्यांचे सरपंच मुकेश तावडे,उपसरपंच लक्श्मीकांत चौधरी ग्रा प.सदस्य योगिराज सुपे,कालु मिस्तरी ,संजय माळी मुबारक ( राजू )तडवी उदय पाटील यांसह सर्व सन्माननिय सदस्यांनी व कर्मचारी यांनी शाल श्रीफळ देवुन त्यांचा सत्कार केला तसेच ग्रा प त नविन ग्रामविकास अधिकारी हजर झाल्याने नया भिडू नया राज सुरू झाला असल्याने नियुक्त अधिकारी यांनी प्रलंबित विकास कामांना गति देण्याची अपेक्षा सर्व पदाधिकारी व सदस्यांनी व्यक्त केली व नव्यानेच रूजु झालेले ग्रामविकास अधिकारी श्री जयकार यांनी गावातील स्वच्छ पाणी पुरवठा ,स्वच्छता ,साफसफाई ,दिवाबत्ती ,करवसुली वर भर देण्यात येईल तसेच प्रलंबीत विकास कामांवर व वृक्षारोपन पाणी बचतीला प्राधान्य देनार आहे व विकास कामे जलदगती करनार असल्याचे सांगितले







