Maharashtra

मुस्लिम महिलांनी आ.शिरीष चौधरींना राखी बांधून दिला बंधुत्वाचा संदेश मानवता धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म-आ.शिरीष चौधरीं

मुस्लिम महिलांनी आ.शिरीष चौधरींना राखी बांधून दिला बंधुत्वाचा संदेश
मानवता धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म-आ.शिरीष चौधरीं

मुस्लिम महिलांनी आ.शिरीष चौधरींना राखी बांधून दिला बंधुत्वाचा संदेश मानवता धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म-आ.शिरीष चौधरीं

अमळनेर
येथिल मुस्लिम धर्मीय महिलांनी आ.शिरीष चौधरी यांना राखी बांधून रक्षा बंधनाचा सण साजरा करीत धार्मिक सौहार्द आणि बंधू प्रेमाचा अनोखा संदेश दिला.तर आपसी प्रेम आणि मानवताधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे व त्याच मार्गाचा अवलंब आपण करीत आहोतअश्या भावना  आ.शिरीष चौधरी यांनी यावेळी व्यक्त केल्यात.
             मुस्लिम भगिनींच्या या निस्वार्थ बंधू प्रेमातून मला गहिवरून आले असून यातून सांप्रदायिक व धार्मिक सौहार्द जोपासल्याचा अनोखा संदेश समाजापर्यंत पोहचणार आहे.असेही आ.चौधरी यांनी याप्रसंगी सांगितले. अमळनेर येथिल ख्वाजा नगर भागातील रहिवासी असलेल्या कुबरा नासरअली जाफरी, जिनदअली अख्तरअली, झयरा अख्तर अली या भगिनींनी आ.चौधरी यांना औक्षण करून मोठ्या मायेने ओवाळले व स्नेहाने आमदारांच्या मनगटाला रक्षा बंधनाची राखी बांधून आपले बंधू प्रेम व सामाजिक सदभावना व्यक्त केली.दरम्यान यानिमित्ताने अमळनेरात प्रथमच मुस्लिम महिला भगिनींनी देखील हिंदू धर्मियांचा रक्षा बंधन हा सण साजरा करून हम सब एक असल्याचे दाखवून दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button