मुस्लिम बांधवांनी शब-ए-बरात सण घरीच साजरा करावा
खिदमतचॅरिटेबल ट्रस्ट पंढरपुर चे जुबेर हमीद बागवान यांचे आवाहन
प्रतिनिधी रफिक आतार
कोरोना या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व मुस्लिम समाज बांधवांनी ९ एप्रील रोजी होणारा शब-ए-बरात सण घरीच साजरा करावा.यावेळी सणाच्या निमित्ताने नमाज पठण करण्यासाठी मस्जिदमध्ये अथवा मरहुमिन ला इसाले सवाब पहुंचवण्यासाठी कब्रस्तान मध्ये जावु नये.सर्व मुस्लिम समाज बांधवांनी आपापल्या घरीच इबादत करावे.तसेच घरुणुच आपल्या मरहुमिन ला इसाले सवाब करावे.प्रशासनाला सहकार्य करुण कोरोनाला सर्वांनी मिळून हरवुया.असे आवाहन खिदमत*चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपुर चे संस्थापक अध्यक्ष जुबेर हमीद बागवान यांनी केले आहे.
शब-ए-बरात या सणाच्या निमित्ताने कोणीही घराच्या बाहेर पडु नये.प्राप्त परिस्थितीमध्ये ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.आणि अशा परिस्थितीमध्ये हे सर्व प्रकारच्या प्रार्थना व नमाज पठण आपण आपापल्या घरामध्ये करावे.पुर्ण लोकडॉन उठेपर्यंत व परिस्थिती पुर्वतत्वावर येईपर्यंत कोणीही घराच्या बाहेर पडु नये.व शासनाच्या नियमांचे उल्लंघन करु नये.सध्या समाजात जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.मात्र हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू,आंबेडकर विचारसरणीच्या महापुरूषांचा महाराष्ट्र आहे.त्यामुळे येथिल जनता विघ्नसंतोषी लोकांना थारा देणार नाही. त्यामुळे अश्या विघ्नसंतोषी लोकांपासुन जनतेने लांब राहुन प्रशासनाच्या आजपर्यत केलेल्या नियोजनाला सहकार्य केलेले आहे व भविष्यातील होणार्या आदेशाला सर्व समाजाने सहकार्य करुन कोरोनाच्या लढ्याला पाठबळ द्यावे.कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवु नये.सोशल मीडियावर आक्षेपार्य व्हिडिओ, मेसेज लाइक करु नये.व फोरवर्ड करु नये.अशा महासंकटामध्ये समाजातील सलोखा टिकवुन सर्वजन एक दिलाने कोरोना विरुध्दचे युध्द जिंकण्यास सज्ज होऊया. असे आवाहन खिदमत*चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपुर च्या वतीने जुबेर हमीद बागवान यांनी केले .






