मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माचल्यात वह्या वाटप करून केले वृक्षारोपन-नितीन निकम याचा स्तुत्य उपक्रम
तालुक्यातील माचला येथील रहिवासी असलेले वृक्षप्रेमी घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन निकम याच्या कन्या ‘सई’ हिच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्ताने माचल्यात वृक्ष लागवड व माचला जिल्हा परिषद शाळेत मुलाना वह्या वाटप करण्यात आला असून अश्या अनोख्या उपक्रमामुळे गावकऱ्यांनी व उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
या स्तुत्य उपक्रमासाठी तहसीलदार अनिल गावीत याच्या हस्ते वह्या वाटप तर भाजप नेते घनश्याम अग्रवाल याच्या हस्ते वृक्षारोपण माचला जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले.
यावेळी मंचावर भाजप नेते घनश्याम अग्रवाल, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार अनिल गावीत, तालुका कृषी अधिकारी पी एन चौधरी,काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजाराम पाटील,गावचे उपसरपंच संतोष पाटील,जगन्नाथ पाटील,
राष्ट्रवादीचे माजी सरचिटणीस शेखर पाटील,सूतगिरणी संचालक भाऊसाहेब पाटील,दोडे गुर्जर संस्थांनचे संचालक प्रवीण पाटील, घुमावल येथील सरपंच वसंतराव पाटील,आदर्श शेतकरी डॉ रवींद्र निकम, प्रवीण निकम,माजी सरपंच भागवत निकम ,केंद्रप्रमुख गजरे ,कृषी सहायक एम डी पाटील, घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे सदस्य वेले येथील माजी उपसरपंच विनोद पाटील,सागर पठार,जितेंद्र पाटील,योगेश सनेर,माजी सरपंच भागवत निकम , योगेश सनेर , पंकज पाटील, माणिक पाटील , गोपाळ पाटील ,सुनील निकम,शांताराम निकम ,शामराव बाविस्कर, ग्रामसेवक रमेश देवरे, व माचला जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
चोपडा तालुक्यातील जनता ही अतिशय प्रेमळ असून सहा महिन्यात मला या तालुक्याने खूपच प्रेम दिले आहे.अश्या सामाजिक उपक्रमातून चांगला संदेश देण्याचे काम नितीन निकम यांनी आज केले आहे.आज गरजू लोकांना मदतीचा हात देऊन वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थिती देऊन आनंद वाटला.
—अनिल गावीत तहसीलदार चोपडा
मी दरवर्षी हा उपक्रम हाती घेतलेला आहे.गरजू मुलाना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना मदत केली पाहिजे या उद्देश असून आज वृक्षारोपणाची अत्यंत गरज असून लावलेली झाडे देखील शंभर टक्के जगवणार आहे.अश्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून लहान मुलाना वेगळा संदेश जाईल, प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलावर वाढदिवसाचे खर्च थांबवले पाहिजे.







