चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माहितीच्या अधिकाराच्या दुरुस्तीच्या कायद्यावर नुकतीच सही केली आणि जनतेला ताकद देणारा माहितीचा अधिकार कायदा जवळ जवळ संपुष्टात आला आहे.माहितीच्या अधिकाराच्या कायद्याला संपवण्यात केंद्रातील मोदी शासन यशस्वी झाले. म्हणून जनतेच्या वतीने मोदी शासनाच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो.आम्ही चोपडेकर यांच्यावतीने निवेदन नायब तहसिलदार पौड साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी दिलीप नेवे , कॉ.अमृत महाजन, आप’चे नेते रईस खान, विद्यार्थी काँग्रेसचे समाधान सोनवणे, हाजी उस्मान शेख, विलास दारुटे सर, मुख्तार सरदार, साबीर अरब, तन्मय बाविस्कर, एन डी बोरसे, आसिम सैय्यद, अँड.आसिफ हुसेन व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
रईस खान (आप युवा जिल्हाध्यक्ष)
यानिमित्ताने आम्ही मागणी करतो की माहितीच्या अधिकाराचा कायदा अधिक सक्षम व्हावा तसेच आरटीआय च्या कलम चार (1-ब) प्रमाणे सर्व शासकीय कार्यालयांनी आपल्याकडील माहिती सार्वजनिक करावी







