Maharashtra

महाराष्ट्रातील पूरग्रस्त मदतीसाठी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने चोपड्यात आयोजित मदतफेरीस उस्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्रातील पूरग्रस्त मदतीसाठी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने चोपड्यात आयोजित मदतफेरीस उस्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्रातील पूरग्रस्त मदतीसाठी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने चोपड्यात आयोजित मदतफेरीस उस्फूर्त प्रतिसाद

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
येथील जैन अल्पसंख्याक महासंघ, चोपडा सिटी फौंडेशन, तालुका मेडिकल असोसिएशन, वंदावन प्रतिष्ठान व आदिवासी विकास परिषदेच्या च्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्याच्या उदात्त उद्देशाने आज पूरग्रस्त मदतनिधी फेरी चे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत उस्फुर्त पणे सढळ हाताने मदत केली.
गोल मंदिर येथे सिटी फौंडेशनचे मार्गदर्शक डॉ विकास हरताळकर यांचे शुभहस्ते नारळ वाढवून फेरीचा प्रारंभ करण्यात आला. बाजारपेठ, बोहरा गल्ली, आजाद चौक, शिवाजी चौक पासून मेनरोड मार्गे गांधी चौक येथे समारोप करण्यात आला.
याप्रसंगी जैन महासंघाचे प्रदेश महामंत्री सुशिल टाटीया, सिटी फौंडेशनचे अध्यक्ष अजय पालीवाल, सचिव जितेंद्र विसपुते, महासंघाचे अध्यक्ष तेजस जैन, उपाध्यक्ष द्वय संजय श्रावगी, मयूर चोपडा, मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष दिपक पाटील, सेक्रेटरी प्रविण मिस्त्री, सुनिल महाजन, सारंग महाजन, स्वप्निल महाजन, वंदावन प्रतिष्ठान चे अध्यक्ष नरेंद्र विसपुते आदि पदाधिकारी उपस्थित होते. सर्व श्री मनोज अग्रवाल सर, मनिष गुजराथी, विनोद बी.टाटिया, एडवोकेट अशोक जैन, राजेंद्र जैन, राजेंद्र स्वामी, चंद्रकांत जैन, नितीन जैन, विपिन जैन, संदेश जैन, राजेंद्र पाटील, अकरम तेली, अजय बारी, दिनेश साळुंखे, मनमोहन सिंग राजपुरोहित, राजमोहम्मद शिकलगर, सनी सचदेव, दिपक बागुल, नीलेश जैन, सागर पाटील, एस.के.सईद, शाम सोनार, दारासिंग पावरा, निमसिंग पावरा, महेंद्र पाटील, जितेंद्र मराठे, दिपक मराठे आदींनी प्रामुख्याने परिश्रम घेतले.
व्यापारी वर्ग, भाजीपाला व फळ विक्रेते, आठवडे बाजारासाठी आलेल्या मायबहिणी, खरेदीदार ग्राहक वर्ग, बूटपाॅलिश वाले, मुरमुरे, झाडू विक्रेते, विविध टपरी धारक, मजूर वर्ग, वाटसरू, पोलीस अधिकारी व कर्मचारी आदिंच्या उस्फूर्त सढळ हस्ते प्रतिसादामुळे काही तासातच हा निधी गोळा होऊ शकला ही उल्लेखनीय बाब होय.
मदत फेरीच्या माध्यमातून एकत्रित एकूण निधी ₹८९१११/- तत्काळ उपयोगी पडावा या साठी फेरी पूर्ण होताच अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी व महामंत्री संदीप भंडारी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मदतकार्यात वर्ग करण्यात येत  असल्याची माहिती आयोजकांतर्फे पदाधिकारी अजय पालीवाल, तेजस जैन, दिपक पाटील, नरेंद्र विसपुते यांनी दिली आहे. या निधीत ललित गांधी फौंडेशन तर्फे भर घालून सुमारे ८१ कुटुंबाना एक महिना पुरेल असे रक्षा-किट रक्षाबंधनाच्या दिवशी वितरित करण्यात येणार असल्याचे प्रदेश महामंत्री सुशिल टाटिया यांनी सांगितले.
सर्व आयोजकांनी चोपडेकर नागरिकांच्या या औदार्याबद्दल आभार मानले आहेत.
*पूरग्रस्त मदत फेरी*
७१५११=०० रोख
०२२००=००धनादेश
————
७३७११=०० एकूण 
+
१४३००=०० रोख (मदत फेरी नंतर जमा)
================
*८८०११=०० रुपये एकूण निधी जमा*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button