चांपा प्रतिनिधी अनिल पवार
महाराजस्व अभियानांतर्गत समाधान योजना शिबिर शनिवारी 13 जुलाई 2019 रोजी सकाळी 11.30 वाजता ग्रामपंचायत कार्यालय, चांपा येथे आयोजित करण्यात आले आहे.उमरेड तालुक्याचे तहसिलदार प्रमोद कदम उपस्थित राहतील.
उमरेडचे तहसिलदार प्रमोद कदम यांनी म्हटले आहे, महसूल प्रशासन अधिक गतिमान होणेसाठी शासनाच्या महसूल विभागाने महाराजस्व अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत विस्तारीत समाधान योजना हा एक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सर्व प्रशासकीय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या राशनकार्ड , आधारकार्ड , श्रावणबाळ , संजय गांधी निराधार योजना , उत्पन्न प्रमाणपत्र , डोमेसिअल सर्टिफिकेट , नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जातीचे दाखले , विविध योजनांचा लाभ नागरिकांना गावातच शिबिर आयोजित करुन व तेथेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन देण्यात येतो. त्यासाठी सर्व प्रशासकीय विभागातील ग्रामस्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी दिवसभर चांपा येथे शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून देणार आहेत.
यासंदर्भात आज सरपंच अतिश पवार यांनी 6 जुलाई 2019 रोजी झालेल्या बैठकीत ही योजना व्यापक स्वरुपात राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारीत समाधान योजना संपूर्ण तालुक्यात व्यापक स्वरुपात राबविणेबाबत व सर्व पात्र लाभार्थ्यांना समारंभपूर्वक लाभ देणेबाबत सूचना दिल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक मंडळस्तरावर प्रत्येक आठवड्यात समाधान योजना शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी चांपा येथे या शिबिराचे आयोजन केले आहे.
यासंदर्भात उमरेड तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांचे प्रमुखांना त्यांच्या विभागांच्या योजना, त्यांचे निकष, संभाव्य लाभार्थी संख्या (उद्दीष्ट) व नियोजनाबाबत तसेच तालुकास्तरावरील अधिकारी व विभागप्रमुख यांच्या बैठका घेवून सूचना दिल्या आहेत, असेही तहसिलदार प्रमोद कदम श्री. सरपंच अतिश पवार यांनी नमूद केले आहे.







