मंजूर विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून त्यांना आजपर्यंत वर्कऑर्डर मिळावी …..रयत क्रांती संघटनेचे निवेदन
चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
तालुक्यातील जवळपास 481 विहिर मंजूर झालेल्या आहेत.सदर विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून त्यांना आजपर्यंत वर्कऑर्डर देखील मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी वर्ग आज वर्क ऑर्डर मिळेल उद्या वर्क ऑर्डर मिळेल या आशेवर आहेत त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे तरी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विहिरींची वर्क ऑर्डर लवकरात लवकर काढून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा ,विनाकारण वर्क ऑर्डर देण्यास विलंब केल्यास रयत क्रांती संगटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल असा देखील इशारा देण्यात आला आहे .या निवेदन देते वेळी रयत क्रांती संगटनेचे जिल्हा सचिव योगेश पाटील, शहराध्यक्ष विजय(पप्पू) पाटील, डॉ. अजय पाटील,देवेंद्र पाटील, मुन्ना राजपूत, योगेश चौधरी,उपस्थित होते .निवेदनावर सदस्य आणि पदाधिकारी यांच्या सह्या आहेत .







