ओडिसा

भेटा आदिवासी समाजातील पहिल्या कमर्शियल पायलटला….तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!!

भेटा आदिवासी समाजातील पहिल्या कमर्शियल पायलटला….तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!!

भेटा आदिवासी समाजातील पहिल्या कमर्शियल पायलटला....तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!!

आजवर भारतात महिला सक्षमीकरणाबद्दल खुप बोलले गेले पण म्हणावी तशी प्रगती दिसत नव्हती. पण आता काळ बदलत आहे. भारतीय महिला सर्व क्षेत्रांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. काही दिवसांपूर्वी हिमा दासने मिळवलेले सुवर्णपदक महिलांसाठी प्रेरणादायी ठरले तर गेल्या काही दिवसांपासून बोभाटाने बेस्टची ड्रायव्हर असलेली महिला, अंत्यविधीचा सामान विकणारी महिला यांच्यासारख्या पुरुषांच्या म्हणवल्या जाणाऱ्या कामात यशस्वी झालेल्या महिलांची ओळख करून दिली आहे. यावरून छोरीया भी छोरो से कम नही हेच सिद्ध होत आहे. आता पण एका जिगरबाज मुलीने मोठे काम केले आहे राव!! ती आदिवासी समाजातील पहिली कमर्शियल पायलट बनली आहे.

भेटा आदिवासी समाजातील पहिल्या कमर्शियल पायलटला....तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!!

ओडिसातील मलकानगिरी या नक्षल प्रभावित परिसरातील अनुप्रिया लाकडा हिने वर्षानुवर्ष आदिवासी मुलींना प्रेरणा मिळेल अशी उंची गाठली आहे. अनिप्रिया आता उड्डाण घेण्यासाठी सज्ज झाली आहे. 27 वर्ष वय असलेली अनुप्रियाच्या नावावर भारतातील पहिली आदिवासी समाजातून आलेली कमर्शियल पायलट बनण्याचा विक्रम झाला आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलची मुलगी असलेली अनुप्रिया सर्वांसाठी आदर्श ठरली आहे. लहानपानापासून असलेले पायलट बनण्याचे स्वप्न इंडिगो एयरलाईन्ससाठी पायलट बनून पूर्ण झाली आहे.
मंडळी, तिचे वडील सांगतात की तिच्या शिक्षणाचा खर्च करणे त्यांना खूप कठीण होते, पण तिला पायलट बनवायचेच हा निश्चय केल्यावर सगळ्या अडचणींना तोंड देऊन तिचे स्वप्न पूर्ण केले. एका साध्या घरात राहणाऱ्या या कुटुंबात सध्या प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.
ओडिसाचे मुख्यमंत्री नविन पटनाईक यांनी पण अनुप्रियाला शुभेच्छा देऊन तिचे अभिनंदन केले. येणाऱ्या काळात अनुप्रिया पासून प्रेरणा घेऊन इतर आदिवासी मुली सुद्धा कर्तृत्व गाजवतील अशी आशा पण त्यांनी व्यक्त केली.
मंडळी, मलकानगिरी जिल्ह्यात अजूनही रेल्वे गेलेली नाही. अशा परीसरातील मुलगी आता थेट विमान उडवणार आहे.

Leave a Reply

Back to top button