भुसावळ शहरातील आदिवासी तडवी भिल समाजातील तडवी द गाईड संस्थेकडून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तडवी भिल नागरी पुरस्कार- 2019 देवून गौरव
प्रतिनिधी मुबारक तडवी
भुसावळ शहरातील आदिवासी तडवी भिल समाजातील *तडवी द गाईड* संस्थेकडून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना *तडवी भिल नागरी पुरस्कार- 2019* देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रम वजीर निजाम तडवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून वकिल याकुब साहेबु तडवी, नासेरखा अकबर तडवी , एम बी तडवी सर हे होते. कार्यक्रमाला भुसावळ नगरीचे विद्यमान *आमदार संजयभाऊ सावकारे* यांची पण उपस्थिती लाभली.
तडवी समाजातील 41 गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांनी शैक्षणिक तसेच क्रिडा क्षेत्रात मिळवलेल्या यशासाठी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उत्कृष्ट आदिवासी नृत्यासाठी अरसलान अशफाक तडवी तसेच उत्कृष्ट आदिवासी पेहराव साठी मुस्कान सलीम तडवी यांना गौरविण्यात आले.
*माननीय आमदार संजय भाऊ सावकारे* यांनी तडवी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले तसेच जात पडताळणी मध्ये येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करण्याचा शब्द दिला व समाजाच्या मंगलकार्यालय कामी निधी पुरवण्याचे प्रतिपादन केले.
समाजभुषण अॅड. याकुब साहेबु तडवी यांनी समाजाच्या जातपडताळणी संदर्भात न्यायालयीन लढाईसाठी योग्य ते मार्गदर्शन केले व भुसावळ च्या समाजातील स्पर्धात्मक परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेट म्हणून उपयुक्त पुस्तके दिली व अभ्यासासाठी कुठलीही मदत करण्याचे वचन दिले.
माजी सेल टॅक्स कमिश्नर मा. नासेरखा अकबरखा तडवी यांनी समाज ऐक्याचे महत्व व आदीवासी तडवी समाजासाठी त्याची गरज यावर प्रकाश टाकला.
प्रसंगी औषधी वनस्पती आणि तडवी स्त्रियांच्या वापरातली दागिनांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
रणजितसिंह राजपूत यांनी महाराणा प्रताप यांच्या कारकिर्दीतील भिलांचे योगदान यावर प्रकाश टाकला तसेच तडवी या लढवय्या समाजाने येणाऱ्या प्रश्नांवर निकराने लढण्याचे सांगितले.
रमेश बुऱ्हाण तडवी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना आईवडिलांनी मायेच्या उबेखाली न ठेवता त्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी बाहेरगावी उपलब्ध असलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी मनावर दगड ठेवण्याचे आव्हान पालकांना केले.
मिरखा तडवी यांनी समाजचळवळीत प्रत्येक घटकाचा सहभाग किती आवश्यक असून समाज बांधवांचे पाय न ओढता त्यांचे हात ओढून प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अलिशान हमजान तडवी, आयेशा अशफाक तडवी यांनी केले. आभार प्रदर्शन अशफाक जरदार तडवी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हमजान पिरखा तडवी, झुल्फिकार लतीब तडवी, तस्लीम रशिद तडवी, हुसेन इब्राहिम तडवी, अमिल अय्युब तडवी,किरण जहाबाज तडवी, आरिफ बहादूर तडवी, सलमान इतबार तडवी, इकबाल रमजान तडवी, संजय बुऱ्हाण तडवी, सोनु खलील तडवी, याकूब फकिरा तडवी, सलीम नशीर तडवी, जावेद सलीम तडवी, जावेद सिराज तडवी, मनोज अल्लाउद्दीन तडवी, निसार निजाम तडवी, तडवी फैजपुरीयन्स आणि तडवी भिल युवा कृती समिती यांनी मेहनत घेतली.







