पुरातन मुर्तींपैकी एक मोठी मुर्तीसह,दिड लाखाचा ऐवज हस्तगत करून तिन आरोपीच्या मुसक्या आवाळण्यात पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व सहकाऱ्यांना यश….
चोरांकडून सुमारे दीड लाखाचा ऐवज हस्तगत पो.नि.बडगुजर यांची पत्रपरिषदेत माहीती….
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात मुंबई गल्लीतील जैन डिगंबर समाजाच्या मंदिरातून चोरीस गेलेल्या देवाच्या धातूच्या पुरातन मुर्त्यापैकी मोठी मूर्तीसह धुळे व पाळधी येथील आणखी तीन आरोपी मिळवण्यात पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धार्मिक मूर्त्यांमुळे संवेदनशील प्रश्न निर्माण झाला होता पोलिसांची खरी कसोटी पणाला लागली होती प्रकाश शाह यांचे कुटुंब बाहेरगावी विवाह सोहळ्यासाठी गेले असताना चोरट्याने घराचा कडी कोंडा तोडून दिगंबर जैन मंदिराच्या तीन पुरातन मुर्त्या , रोख रक्कम व दागिने असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला होता त्यामुळे संवेदनशील प्रश्न निर्माण झाला होता विशेष म्हणजे अमळनेरात डिगंबर जैन समाजाचे हे एकमेव स्थान असल्याने सर्व समाज बांधवांनी तीव्र भावना व्यक्त केली यामुळे याची गंभीर दखल पोलिसांनी लागलीच घेऊन घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे सहाय्यक पोलिस अधीक्षक अग्रवाल, डी वाय एस पी राजेंद्र ससाणे,पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व जळगाव एलसीबी पथकाने भेट दिली होती. पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी राजू शेख व अनिल सोनवणे या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळवली मात्र आरोपी गुन्हयची कबुली देत नव्हता दुसरीकडे मंदिरातील पूजा बंद झाल्याने जैन बांधवांचा दबाव वाढला होता चंद्रप्रभु भगवान् शांतीनाथ भगवान , पाश्वनाथ भगवान यांची पंच धातूची मूर्ती असल्याने जैन बांधवांच्या धार्मिक व जिव्हाळ्याचा प्रश्न होता राजू शेख याने दोन मुर्त्या काढून दिल्या होत्या मात्र तिसरी मोठी मूर्ती मिळत नव्हती शेख याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सूनवल्याने त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे दरम्यान पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या मार्गदशनखाली सी डी आर तपासून तपासाची चक्रे फिरवल्या नंतर पाळधी येथील योगेश सुभाष कोळी याला ताब्यात घेतल्यानन्तर धुळे येथील कल्पेश शामराव वरवटे रा रेल्वे स्टेशन धुळे व मोहन सुभाष झोटे रा साक्री रोड यशवंत नगर धुळे यांची नावे उघडकीस आली तेव्हा मोठी मूर्ती कल्पेश जवळ असल्याची माहिती मिळाली त्याने ती शिरपूर येथील विकास सुभाष तेलंग उर्फ बबलु याला दिली होती कल्पेश व मोहन हे घटनेच्या दिवशी ९ जून रोजी दुपारी मुंबई गल्लीत आले होते राजू शेख याच्याशी संगनमत करून त्यांनी धाडसी घरफोडी केली होती शोध पथकातील हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील , किशोर पाटील , मिलिंद भामरे ,भटू तोमर ,प्रदीप पवार, योगेश महाजन , ईश्वर सोनवणे , राहुल चव्हाण यांनी शिताफीने आरोपींच्या परस्पर संपर्कचा फायदा घेऊन फागणे येथे बोलावून अटक केली त्यांच्याकडून चोरीतील लॅपटॉप , ३८० ग्राम चांदीची लगड , ४ ग्राम सोने , मोबाईल ताब्यात घेतले आहे तिघा आरोपीना न्या एस एस अग्रवाल यांनी २२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असेही पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी सांगितले







