Maharashtra

पुनगाव केटी वेअर बंधारा निकृष्ट काम; पहिल्याच पावसात गळती जलयुक्त शिवार अभियानाचा फज्जा; चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी

पुनगाव केटी वेअर बंधारा निकृष्ट काम; पहिल्याच पावसात गळती

जलयुक्त शिवार अभियानाचा फज्जा; चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी

पुनगाव केटी वेअर बंधारा निकृष्ट काम; पहिल्याच पावसात गळती जलयुक्त शिवार अभियानाचा फज्जा; चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी


जळगाव पारोळा प्रतिनिधी कमलेश चौधरी
पारोळा: तालुक्यातील पुनगाव शिवारातील केटी वेअर बंधारा दुरुस्ती करूनही पहिल्याच पावसात गळती लागल्याने (लिकेज) झाल्याने शासनाने लाखो रुपये खर्च करून राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियान कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी  निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे.
पुनगाव परिसरात पशुपालक, शेतकरी व नागरिकांना पाण्याअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती समोर येऊ नये या अनुषंगाने के टी वेअर बंधाऱ्याची दुरुस्ती परिसरात लाखो रुपये खर्च करून शासनाने केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातुन केटी वेअर बंधाऱ्याची दुरुस्ती केली. मात्र दुरुस्तीनंतर ही परिस्थिती जैसे थे असल्याने जलयुक्त शिवार अभियानाचा फज्जा उडाला आहे. म्हणून झालेल्या कामांचे चौकशी करून अंदाज पत्रकानुसार काम करण्याची मागणी होत आहे.
पारोळा तालुक्यात आजही अर्धा पावसाळा संपण्यात आला तरी  पाण्याअभावी आजही अनेक गावे दुष्काळी परिस्थितीने होरपळत आहे. परिसरात शेतकरी, पशुपालक व नागरिक मोठ्या प्रमाणावर चिंतातूर झाले आहेत. जनावरांना चारा, पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, प्रत्येक खेडोपाडी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पुनगावसह परिसरात पाण्याच्या पातळी वाढविण्यासाठी व जलस्तर उंचावण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून सिमेंट केटी वेअर बंधारे काम राबविण्यात आले होते. 
बोरी नदी पात्रावर  सिमेंट केटी वेअर बंधाऱ्याची नव्याने दुरुस्ती करण्यात आली त्यात तब्बल ३२ लाखाचं खर्च झाला. मात्र  दुरुस्ती करण्यात आलेला बंधारा पहिल्याच पावसात गळती होत असल्याने निरुपयोगी ठरला आहे. बंधारे बांधून पाणी गळती होत असल्याने पाणी वाया जात आहे. म्हणून जलयुक्त शिवार अभियान ही योजना निष्फळ ठरली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
शासनाने लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केली मात्र दुरुस्ती निष्फळ ठरल्याने कामाची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यातून योजना निसर्गाने गिळंकृत केली की संबंधित अधिकाऱ्यांनी, ठेकेदारांनी हे लक्षात येईल आणि शासनाच्या झालेल्या निधीची हानी भरून काढण्यासाठी मदत होईल,  निवेदनात म्हटल्याप्रमाणे वाळू मातीमिश्रित वापरली आहे तसेच लोखंड कमी वापरण्यात आले असल्याने  ग्रामस्थांनी कामाची चौकशीची मागणी केली आहे. 
उप अभियंता लघुसिंचन विभाग पारोळा यांना निवेदन    
देतेवेळी उदय निकम, मुरलीधर माळी, अभय पाटील, रमेश पाटील, देविदास पवार, विशाल पाटील, सुधाकर पाटील, चंद्रकांत माळी, रामदास चौधरी, विठोबा पाटील, मनोज माळी आदी उपस्तीत होते.
महाराष्ट्र मराठी 7 न्यूज कमलेश चौधरी पारोळा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button