Maharashtra

पिंपळे आश्रम शाळेत गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

पिंपळे आश्रम शाळेत गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

पिंपळे आश्रम शाळेत गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी अविनाश पवार
अमळनेर तालुक्यातील पिंपळे   आश्रमशाळेत  शाळेत गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते , या दहीहंडी उत्साहा च्या आयोजनामागे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना रामायण, महाभारत ,यासारख्या ग्रंथांची ओळख व्हावी त्यातून काहीतरी बोध मिळावा, म्हणून अशा कार्यक्रमांचे आयोजन आश्रम शाळेत नेहमीच केले जात असते. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्र राहणे ,एकमेकांची काळजी घेणे ,कोणताही भेदभाव न करणे, अशा गुणांची जोपासना व्हावी असा उद्देश असतो .त्यामुळे असे कार्यक्रम नेहमीच घेतले जात असतात. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती माधुरी पाटील ,नितीन सोनवणे, मुकेश पवार ,राहुल पाटील, दीपक नांद्रे, संजू पवार ,आशिष निकम, आदींनी परिश्रम घेतले, विद्यार्थ्यांना बाल श्रीकृष्ण राधा असे वेष परिधान केले होते ,विद्यार्थ्यांनी आळीपाळीने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला शेवटी तीन थरांची बालगोपाळांची दहीहंडी फोडण्यात बालगोपाळ यांना यश आले.
दहीहंडी उत्सवाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री उदय पाटील व श्री अविनाश अहिरे यांनी दहीहंडीचे पूजन केले व नंतर अत्यंत उत्साहात दहीहंडीचा उत्सव आश्रम शाळेत रंगला ,यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते.
असे कार्यक्रम सण-उत्सव साजरे करण्याची प्रेरणा आम्हाला आमच्या संस्थेचे अध्यक्ष माईसाहेब विद्याताई पाटील व मार्गदर्शक नानासाहेब युवराज पाटील त्यांच्यापासून मिळत असते असे मुख्याध्यापकांनी सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button