पहिल्याच पावसाने अमळनेर रस्त्यांची दुर्दशा ……
ठिकठिकाणी साचले पाणी…..
अमळनेर प्रतिनिधी
काल अमळनेर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. संपूर्ण तालुक्यात चांगला पाऊस पडला त्यामुळे नागरिक आणि शेतकरी राजा सुखावला परंतु पहिल्याच पावसाने अमळनेर शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे पाणी निचरा होण्या साठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना नगरपरिषद प्रशासनाने केलेली नाही. अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे. पहिल्याच पावसात ही स्थिती आहे तर पुढे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.








