भिवंडी

पडघ्यात नवरात्रीच्या निमित्ताने महामानवांचा आठवणींना गाण्याच्या माध्यमातून उजाळा

पडघ्यात नवरात्रीच्या निमित्ताने महामानवांचा आठवणींना गाण्याच्या माध्यमातून उजाळा

भिवंडी प्रतिनिधी मिलिंद जाधव

भिवंडी तालुक्यातील बालाजीनगर मित्र मंडळ पडघा येथे नवरात्रीच्या निमित्ताने सर्वच एकत्र येतात म्हणून, नागरिकांचे प्रबोधन व्हावे, म्हणून बालाजीनगर मित्र मंडळ पडघा यांच्या वतीने उल्हासनगर येथील ‘सूर क्रांतीचे’ या टीमने महामानवांचे विचार,शाहिरी जलसाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘सूर क्रांतीचे’ शाहीर रोहित जगताप ,धम्मादास साळवे, रोहित गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्ध,शिवराय, फुले शाहु आंबेडकर, जिजाऊ, दाभोळकर यांचे विचार शाहिरी जलसातून मांडण्यात आले. तर विज्ञानाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी करण्यात आली.

ग्रामीण भागातील नागरिकांमधील अंधश्रद्धा नाहीशी करण्यासाठी व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज आज आहे. ग्रामीण भागात भूत-प्रेत हे मानले जाते. त्याचबरोबर आजारी असल्या नंतर करनी करणे व ग्रामीण भागातील भगत, बुवा बाजी यांच्याकडे जाऊन उपचार घेत असतात. त्यामुळे लोकांचे आर्थिक व शारीरिक शोषण व फसवणूक थांबली पाहिजे. म्हणून अशा प्रकारच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपण विज्ञानाकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. प्रबोधनाच्या कार्यक्रमातून आम्ही नेहमीच समानता वाढविण्याचे काम करतो. भूत, प्रेत नसतात, महामानवांचे विचार सकारात्मक दृष्टीने घ्या, संविधानाने आपले रक्षण केले आहे. असे शाहिर रोहित जगताप यांनी सांगत प्रबोधनात्मक कविता, गाणी सादर केली. तर धम्मादास साळवे,रोहित गोडसे यांनी समाजपरिवर्तन, समतेचे, क्रांतीची गाणी सादर केले. तर परेश सोनावणे, श्रद्धा भालेराव यांनी त्यांना गाण्यात साथ दिली.

मागील वर्षी आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन द्वारे अंधश्रद्धा दूर करा असे आवाहन केले होते. तर यावेळी महामानवांचे विचार व त्यांचे कार्य नागरिकांपर्यंत पोहचावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न बालाजीनगर मित्र मंडळ पडघा यांनी दिला आहे. असे आयोजकांनी बोलतांना सांगितले.यावेळी ‘सूर क्रांतीचे’ टीमचे शाहिर रोहित जगताप, धम्मादास साळवे, रोहित गोडसे, परेश सोनावणे, श्रद्धा भालेराव,बालाजीनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष मोहन गोरले, ऊपाध्यक्ष. कमलाकर विशे, सचिव रोहीत राऊत, खजीनदार अँड. कल्पेश पाटील, सल्लागार राहुल पाटोळे, अँड.शशिकांत गोतारणे यांच्यासह पडघा विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन मंडळाचे खजीनदार अँड. कल्पेश पाटील यांनी केले.

Leave a Reply

Back to top button