न.पा.ची ऊर्दु शाळा स्थलांतरित
अमळनेर:- प्रतिनिधी सुनील पवार
येथील न.पा.ची ऊर्दु शाळा क्र.११व्हाईट बिल्डींगच्या पडक्या ईमारतीत असलेने,पडक्या ईमारतीची अवस्था पाहता दारुल-कजा अमळनेरचे अध्यक्ष श्री.फयाजखाॅ पठाण,सत्तार मास्तर,न.प.सदस्या हाजी शेखा मिस्तरी व सहकारी यांचे शिष्टमंडळासह भेट घेऊन विनंती केली असता,मा.आमदार श्री.साहेबरावदादा पाटील यांचे मध्यस्तीने सदर शाळा गांधलीपुरा साईट क्रं.७१ मध्ये हस्तांतंरास मान्यता देणेत आली!सदर शाळा गांधलीपुराच्या नविन जागेत हस्तातंरण होत असलेने मुस्लीम समाजात,विद्यार्थी-पालकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. या प्रसंगी नगरसेवक मनोज पाटील,निशांत अग्रवाल,विवेक पाटलांसह दलीत नेत रामभाऊ संदानशिव हे ऊपस्थित होते!मुस्लीम समाजाच्या वतीने सत्तार मास्तर यांनी मा.आमदार कृषीभुषण साहेबरावदादा पाटील,नगराध्यक्षा सौ.पुष्पलता सा.पाटील व मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर,अभियंता संजय पाटील व सहकार्यांचे आभार मानले.







