Maharashtra

नाशिक मधील व्यक्तीने धुळ्यातील लॉज मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याने धुळ्यात उडाली खळबळ .

नाशिक मधील व्यक्तीने धुळ्यातील लॉज मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याने धुळ्यात उडाली खळबळ …

नाशिक मधील व्यक्तीने धुळ्यातील लॉज मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याने धुळ्यात उडाली खळबळ .

   धुळे प्रतिनिधी भाग्यश्री बागुल            
धुळे शहरातील पांच कंदील चौकातील नव्याने सुरू झालेल्या लॉज मध्ये नाशिक मधील अंबड चे पॉवर इंजिनिअरिंग कंपनी  मध्ये काम करणारे संभाजी धोंडू पाटील वय ४५ रा . नाशिक हे  दिनांक ५ ऑगस्ट रोजी लॉज मध्ये थांबले होते ते त्यांचे कामकाज आटोपून पुन्हा लॉज आले होते . दुसऱ्या दिवशी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांची लॉज सोडण्याची वेळ झाली होती .कर्मचाऱ्याने दरवाजा वाजवला .तसेच रूम मधील फोन वर फोन केला तरीही प्रतिसाद न मिळाल्याने लॉज चे कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावून दुपलिकॅट चावी ने दरवाजा उघडला असता संभाजी धोंडू पाटील हे विष प्राशन केलेल्या अवस्थेत आधलून आले त्यांना रुग्ण वाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान संभाजी पाटील यांच्या खिश्यात आत्महत्या पूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्या चिटी मध्ये विकास बागुल या कंपनी मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या त्रास बद्दल आत्महत्या केल्याचे नमूद आहे . संभाजी पाटील हे मूळचे धुळे जिल्ह्यतील नावरा नावरी गावाचे असल्याचे सांगितले जात आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button