नारपार योजना मार्गी लावण्याचा संकल्प — खासदार उन्मेष पाटील
चाळीसगांव -प्रतिनिधी नितीन माळे
तापी खोरे व गिरणा खोऱ्याचे पाणी आपल्या डोळ्यासमोर वाहून जाते परंतु आपल्याला मात्र सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी नार पार योजनेचा अग्रक्रमाने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याच बरोबर येत्या काळात नारपार योजनेच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पाचे पाणी सततच्या दुष्काळी नांदगाव तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रात अग्रक्रमाने मिळून देण्याचा संकल्प आज शनि महाराजांच्या श्रीक्षेत्र नस्तनपुर च्या सांक्षीने करीत असल्याची ग्वाही जळगााव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली आहे . क्षेत्र नस्तनपुर येथे श्री शनिमहाराज मंदिर संस्थानचे वतीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात श्री क्षेत्र नस्तनपुर येथे श्रावण मास निमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज रोजी श्री शनि महाराजांची अभिषेक महापूजा खा. उन्मेष पाटील व संपदाताई पाटील यांचे शुभहस्ते सपत्नीक संपन्न झाली.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशासकीय कार्यालयात खा.पाटील व उमंग महीला समाज शिल्पी परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील यांचा संस्थांनचे अध्यक्ष नारायण अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थांनचे जनरल सेक्रेटरी अनिल दादा आहेर, अध्यक्ष तथा शिक्षण महर्षी नारायणभाऊ अग्रवाल, उमंग परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील, चाळीसगांव भाजप तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, माजी आमदार संजय पवार, संस्थानचे विश्वस्त विजय चोपडा, खासेराव सुर्वे,डॉ शरद आहेर, उदयआप्पा पवार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान पाटील,डॉ.प्रभाकर पवार संजय आहेर,अनंतराज आहेर, गणेश शिंदे,पुरुषोत्तम निकम, भास्कर शेवाळे,हरेश्वर सुर्वे, नवनाथ बोरसे, कैलास गायकवाड, बापू आगोणे,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थांचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार अँड. अनिल आहेर यांचे मार्गदर्शनाखाली समाधान पाटील यांनी खासदार पाटील यांच्याकडे नारपार नदीजोड प्रकल्पाचे पाणी नांदगाव तालुक्याला मिळवून देण्यात सर्वतोपरी मदत करावी अशी मागणी केली.
खासदार पाटील पुढे म्हणाले की तापी खोरे व गिरणा खोऱ्याचे पाणी आपल्या डोळ्यासमोर वाहून जाते परंतु आपल्याला मात्र सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे अशी खंत खासदार पाटील यांनी व्यक्त केली ही बाब लक्षात घेता नांदगाव तालुक्यासह उत्तर महाराष्ट्राला नारपार नदीजोड प्रकल्पाचा लाभ मिळून देण्यात यावा यासाठी आपण शासन स्तरावर सतत आग्रही असून हे पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न करणारच असे ठोस आश्वासन खा.उन्मेष पाटील यांनी यावेळी दिले शासन स्तरावर यासंदर्भात महत्त्वाच्या बैठका होणार असून या बैठकीला या विषयास न्याय देण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला नस्तनपुर क्षेत्राचे भावी विकास कामांना मदत करण्याचे जाहीर आश्वासन त्यांनी या सोहळ्यात दिले. सदर प्रसंगी खासदार पत्नी सौ संपदा पाटील यांचा विजय चोपडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी वर्गाचे वतीने नस्तनपुर येथे आज यात्रा निमित्त साबुदाणा प्रसादाचे संपूर्ण दिवसभर वाटप करण्यात आले आजची महाभिषेक पुजा संपन्न होताच प्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले. याठिकाणी खासदार उन्मेष पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले. पुजारी विनीत कुलकर्णी यांनी पौराहित्य केले. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते. मंदिराच्या परिसरात आज अनेक नवस असल्याने दिवसभर भाविकांची गर्दी होती.








