नगरपरिषदेत सह्यांचा भ्रष्टाचार उघड….
अमळनेर (प्रतिनिधी)
अमळनेर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी दिलेल्या माहिती नुसार अमळनेर नगरपरिषदेच्या सेवाविषयक आणि इतर प्रशासकीय, अति महत्वाच्या दस्तऐवजांवर,कागदपत्रांवर,आदेशांवर अनधिकृत पणे काही कर्मचारी सह्या करीत असल्याची माहिती दिली या संदर्भात उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी जिल्हाधिकारिंकडे तक्रार केली आहे.
आस्थापनेवर नियुक्त संजय टी.पाटील हे लिपिक असून अभियंता पदाच्या व्यक्तींना डावलून आस्थापनेच्या बांधकाम परवानगी , बांधकाम पूर्णत्वाचा दाखला ,ना हरकत दाखलयांवर सह्या करीत आहेत.बांधकाम विभागाचे अभियंता हे पद महत्व पूर्ण असून जर या पदावरील व्यक्ती ला विश्वासात न घेता लिपिक सह्या करत असेल तर अभियंता हे पद का अस्तित्वात आहे असाही प्रश्न उपमुख्याधिकारी यांनी भ्रमणध्वनी वर उपस्थित केला आहे.
कर विभाग व प्रशासकीय सेवेतील कर्मचारी नागेश ए खोडवे हे *नगरलेखापाल* या आर्थिक व महत्वाच्या पदावर सह्या करीत आहेत. लिपिक पदावरील नितीन खैरनार हे अग्निशमन अंतर्गत नगर अभियंता या पदावर कार्यरत असून बेकायदेशीर सह्या देखील करीत आहेत अशी तक्रार उपमुख्याधिकारी यांनी केली आहे.सदर प्रकार हा बेकायदेशीर असून महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार आणि महाराष्ट्र शासन राजपत्र ३० जानेवारी २०१८ अनुसार याबाबत चौकशी करून हे प्रकार थांबवावे आणि दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी लेखी तक्रारी द्वारे प्रशासन अधिकारी संदीप गायकवाड यांनी जिल्हाधिकारिंकडे केली आहे.
असे असेल तर नगरपरिषद प्रशासनाने अभियंता, नगर योजक (town planner), लेखा पाल (Auditer)ही पदे बरखास्त करून शासनावरील भार कमी करावा.







