देवळी येथे गुणवंत विध्यार्थी गुणगौरव व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामे केल्या बद्दल रजनी प्रतिष्ठान चा गौरव
अमळनेर प्रतिनिधी-शिवाजी महाजन
तालुक्यातील देवगाव-देवळी येथे संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच व महाराष्ट्र माळी समाज महासंघ तर्फे विध्यार्थी गुणगौरव व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्ये केल्याबद्दल रजनी प्रतिष्ठान या संस्थेचा गौरव करण्यात आला यावेळी साप्ताहिक शौर्याचा आवाज चे मुख्य संपादक योगेश कापडणे यांनी रजनी प्रतिष्ठान तर्फे प्रमाणपत्र ट्रॉफी सोबत सन्मान स्वीकारला यावेळी क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच चे संस्थापक प्रवीण बी.महाजन शिरूड येथील सरपंच काशीनाथ माळी भिलाली येथील उपसरपंच अमोल माळी शिवाजी महाजन आदी उपस्थित होते तसेच यावेळी गुणवंतांचा सत्कार होऊन गौरवण्यात आले तसेच सायंकाळी पालखी मिरवणूक व रात्री वासुदेव महाराज आर्वीकर यांचा कीर्तनाचा कार्येक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.







