दिनांक २४जुलै १९ रोजी लोक संघर्ष मोर्चाचा अमळनेर प्रांत कार्यालयावर “उलगुलान”मोर्चा
वन हक्क कायद्याची जनपक्षीय अमलबजावणी करा,वन विधेयक १९२७मधील सुधारणा विधेयक मागे घ्या , सर्व शेतकऱ्यांना मान्य केल्या प्रमाणे दुष्काळी अनुदान त्वरित आदा करा, स्वाभिमान सबळीकरण योजने अंतर्गत तात्काळ भूमिहीन आदिवासींना जमिनी द्या, वन पाडे महसूल करा, वन जमीन धारकांना तात्काळ 7/12 देण्यात याव्यात, अतिक्रमण जमिनीवर असलेले घर तात्काळ नियमनाकुल करावीत, मोटर सायकल असणाऱ्या लोकांना रेशन बंद ही जाचक अट रद्द करावी ह्या सह अनेक स्थानिक मागण्या सह हा मोर्चा प्रांत कार्यालयावर येईल ह्या वेळी सबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यानं बरोबर चर्चा करून लेखी घेतल्या शिवाय हा मोर्चा हटणार नाही.
मोर्चा पैलाड येथील शनी मंदिरा पासून निघून दगडी दरवाजा,सुभाष चौक, नगर पालिका (नगर पालिकेला निवेदन देवू) स्टेट बँक मार्गे बस स्टँड ,महाराणा प्रताप चौक मार्गे प्रांत कार्यालय येथे पोहचेल व तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर होईल व आपल्या मागण्या मान्य होई पर्यंत मोर्चा बेमुदत चालेल.प्रातिभा शिंंदे,प्रा जयश्री दाभाडे साळुंके,प्रकाश बारेला,धर्मा बारेला, बुधा बारेला,संजय शिरसाठ, रैना बारेला, सचिन धांडे, पन्नालाल मावळे, प्रा जयश्री दाभाडे साळुंके, पंडित चव्हाण,संजय पवार, मधुकर चव्हाण, अविनाश पवार,प्रकाश पारधी, गाजू बारेला, इरफान तडवी , जिला वसावे , नितीन साळूंके, हेमंत दाभाडे, धनराज पारधी, आप्पा दाभाडे, अनिल पारधी.







