तोतया पोलीसाला चोपड्यात अटक
चोपडा (प्रतिनिधी सचिन जयस्वाल)
शिरपुर चोपडा हायवेवर चहार्डी फाट्याजवळ येणाऱ्या जाणाऱ्या आदिवासी लोकांच्या मोटार सायकली अडवुन त्यांच्याकडून कागद पञाची तपासणी करून पोलीस असल्याचे भासवुन स्वतःच्या आर्थिक फायदा करण्यासाठी हा महाठग गेल्या तिन दिवसापासून तालुक्यात फिरत होता याबाबत पोलिसांना त्याच्या सुगावा मिळाला होता त्या अनुषंगाने त्याच्यावर शहर पोलिसांची करडी नजर होती शेवटी दि.७ जुलै रोजी या तोतिया पोलिसाला शहर पोलिसांनी अखेर अटक केली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की,पारोळा येथिल भिकन पंडित शर्मा हा होमगार्ड दलात काम करीत असताना त्याच्यावर पारोळा पोलिस स्टेशनला २००९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच तो आचारीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता होमगार्ड दलात काम करीत असताना त्याच्या अगांवर होमगार्डची खाकी वर्दी परिधान करायचा म्हणून त्याच्या डोक्यात खाकी वर्दिचे भुत शिरल्यामुळेच त्याने गैरफायदा घेऊन दि.४ व ७ जुलै रोजी शिरपुर चोपडा हायवेवर चहार्डी फाट्यावर आदिवासी समाजाचे लोकांच्या येणाऱ्या जाणाऱ्या मोटार सायकली यांना हात दाखवून वाहन थांबवुन पोलीस असल्याचे बतावणी करून वाहन धारकांकडुन वाहनांची कागद पञाची तपासणी करून त्याच्याकडून पैशाची मागणी करीत होता याबाबत होमगार्ड दलात कार्यरत असलेले संदीप लक्ष्मण सोनवणे यांनी पो ना प्रदीप हिम्मत राजपुत यांना मोबाईलवरुन दि.४ जुलै रोजी दुपारी एक इसम वाहनांना अडवुन तपासणी करीत असुन पैशाची मागणी करीत आहे असे सांगितले असता बातमीची शहानीशा करण्यासाठी प्रदिप राजपुत व पो काँ नितिन कापडणे असे दोघेही पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले असता तेथुन त्याने पळ काढुन घेतला होता म्हणून त्यांना आढळून आला नव्हता तो पून्हा दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याच जागेवर वाहनांना थांबवुन तपासणीचा नावाखाली पैशांची मागणी करीत असताना होमगार्ड संदिप सोनवणे रा. गलवाडे यांना हा तोच इसम आहे म्हणून त्यांनी लागलीच मोबाईलवर संपर्क करून माहिती दिली असता आम्ही येतो तो प्रयत्न त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले पो ना प्रदिप राजपुत व पो ना ज्ञानेश्वर जगावे दोघांनी घटनास्थळी गाठून आर्टीका वाहन क्र.एम एच २४ ए एफ ६६०१ हे अडवुन सदर वाहनाची कागद पञाची तपासणी करीत असताना त्याच्या जवळ जाऊन त्यास त्याचे नाव गाव बाबत विचारपुस करीत असताना तोतिया पोलिसाची बोबडी उडाली आणि घाबरून त्याने उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने माझ नाव भिकन पंडित शर्मा रा.तलाव गल्ली पारोळा असे सांगितले असुन त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळुन पँनकार्ड,आधारकार्ड,लायसन्स, व युनिफार्म वरील फोटो मिळुन आले असुन त्याच्या ताब्यातील प्लाटीना मो.सा.क्र.५६९२ जप्त करण्यात आली आहे पो ना.प्रदीप राजपुत यांच्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोलिसात भिकन पंडित शर्मा (५०) यांच्या विरुध्द भादवि कलम १७०,४१९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास मधुकर पवार करीत आहे







