Maharashtra

तळेगाव आरोग्य केंद्रात निरोप समारंभ संपन् अखेर डाॅ प्रमोद सोनवणेंना अश्रू झाले अनावर

तळेगाव आरोग्य केंद्रात निरोप समारंभ संपन्
अखेर डाॅ प्रमोद सोनवणेंना अश्रू झाले अनावर

तळेगाव आरोग्य केंद्रात निरोप समारंभ संपन् अखेर डाॅ प्रमोद सोनवणेंना अश्रू झाले अनावर

तळेगाव ता चाळीसगाव मनोज भोसले
आरोग्य केंद्रातील डाॅ प्रमोद सोनवणे यांची अक्कलकुवा जि नंदुरबार व डाॅ आशा राजपुत यांची आयुर्वेदिक दवाखाना दरेगाव ( मनमाड ) येथे गट ब वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली झाल्याने तळेगाव आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्नेहभोजन व निरोप समारंभ आयोजित केला होता. 
तळेगाव आरोग्य केंद्रातील कर्मचारींसह परिसरातील नागरिकांनी व जि प सदस्य मा अतुलदादा देशमुख, प स सदस्य अजय भाऊसाहेब पाटील, सौ प्रिती विष्णू चकोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे सर यांचे साडेतीन वर्षात रूग्णसेवेतून जे भरभरून प्रेम दिले त्यामुळेच *सत्काराला निरोप देतांना अखेर त्यांचा अश्रूंचा बांध फुटल्याने डाॅ प्रमोद सोनवणे झाले भावुक व स्तब्ध होत रडत होते.*
प्रसंगी वातावरण अंत्यत भावुक झालेने शांतता पसरली होती. 
डाॅ प्रमोद सोनवणे म्हणजे हसतखेळत जगणारे व कोणत्याही विषयावर तासोंतास भाषण देऊ शकणारे निर्भिड व कडक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व असूनही  ते भावुक झाल्याने उपस्थित कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदींना सुद्धा अश्रू अनावर झालेत.
 प्रामाणिकपणे दिलेल्या रूग्णसेवेमुळे
तळेगाव माझ्यासाठी लकी ठरले असून तेथे आलेनंतर माझ्या कुटुंबाचादेखील उद्धार झाल्याचे डाॅ सोनवणे म्हणाले.
तर डाॅ राजपुत यांनीही कर्मचारींनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानलेत.
सौ महाजन , श्री देशमुख,  श्री राकेश पाटील यांचेसह आरोग्य सहाय्यक एल सी जाधव, विठ्ठल चव्हाण, सौ पुष्पा शिनकर, सौ कोळी , सौ ज्योत्स्ना शेलार, विजय सोनवणे,  नितीन तिरमली ,सौ शितल सोळुंके, निलेश देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. 
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उंबरखेडचे वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी डॉ भुषण राजपुत यांनीही सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
*आरोग्य केंद्राचे जेष्ठ कर्मचारी उदयसिंग पाटील यांचा उत्कृष्ट कार्यासाठी सपत्निक सत्कार करण्यात आला*. 
यावेळी व्दितीय वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिलेल्या डाॅ आशा राजपुत मॅडम, आरोग्य सहाय्यिका सौ सुनंदा महाजन, आरोग्य सेवक विजय देशमुख, शंकर मोरे , राकेश पाटील  यांनाही निरोप देण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button