अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशासाठी शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून किर्तनातुन जवानांचे चरित्र उच्चारण्याचे धाडस आक्रुर महाराज साखरे यांनी केले.प्रथम प्राथमिक शाळेत ध्वजारोहण झाल्यानंतर गावातून ग्रामस्थांची दिंडी मिरवणूक काढण्यात आली.गवळण, भजन,किर्तन, अन्नदान,गावात सडा समार्जन,रांगोळी, असे नाना उपक्रम राबवून स्वातंत्र्यदिन साजरा करुन समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला. सरपंच बाबासाहेब चितळे,ह.भ.प. अर्जुन महाराज चितळे, मच्छिंद्र महाराज चितळे,रवींद्र महाराज चितळे,युवा नेतेसुभाष माने व कै.बाळासाहेब माने मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.ह.भ.प. साखरे महाराज यांनी शहिद कौस्तुभ राणे,भगतसिंग, चंद्र शेखर आझाद, राजमाता जिजाऊ यांच्या जिवनकार्यावर प्रकाशझोत टाकून ऊपस्थीत ग्रामस्थांचे डोळे पाणावले.ढवळेवाडी हे समाजात नवीन आदर्श निर्माण करणारे गाव आहे.या उपक्रमात गट,तट बाजूला ठेवून संपूर्ण ग्रामस्थ सहभागी झाले होते. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर
ढवळेवाडी येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशासाठी शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून किर्तनातुन जवानांचे चरित्र
अहमदनगर प्रतिनिधी सुनील नजन







