जि.प. कन्या शाळा.नं१ येथे मा. आम.किशोरअप्पा पाटील यांच्या उपस्थितीत दातृत्वाचा ऋणनिर्देश सोहळा संपन्न
चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
कन्या शाळा नं १ पाचोरा येथे ज्या दानशूर व्यक्ती व संस्थांनी शाळेसाठी देणगी दिली त्या सर्व दात्यांचा सत्कार *मान.आमदार अप्पासो किशोरजी पाटील* यांच्या हस्ते करण्यात आला .
यात प्रामुख्याने मुकुंदअण्णा बिल्दीकर यांनी शाळेला 50000₹ किंमतीचे प्रोजेक्टर व साऊंड सिस्टीम , विवेक वर्धिनी पतसंस्थेचे मा.चेअरमन अॅड.गोरक्षनाथ देवरे व विद्यमान चेअरमन आबासो सदाशिवराव पाटील यांनी दोन कॉम्प्यूटर सर्व मुलांना उच्च प्रतीचे दप्तर असे एकूण 75000₹ , नगरसेवक मा.रविभाऊ केसवाणी व निर्मलसीडस् चे मॅनेजर मा.सुरेशजी पाटील यांनी संयुक्तरित्या सर्व मुलांना 55000₹ किंमतीचे उच्च प्रतीचे बुट, रयतसेना पाचोरा तालुका या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा.रमाकांतजी पवार यांनी 10000₹ च्या वह्या मुलांना दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी 31000₹आर.डी. पाटील सर यांनी 5000₹ तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रत्येकी 3500₹ शाळेसाठी योगदान दिले. मुख्या.गुलाबराव पाटील व सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून 100% सर्व 159 विद्यार्थ्यांना गणवेष,पाट्या व लेखन साहित्य पुरविण्यात आले.
या सर्व दानशूर व्यक्तीचा आ. अप्पासो किशोरजी पाटील यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
तसेच शाळेसाठी बहूमोल योगदान दिलेल्या श्री. सुभाष देसले , श्री.आर.के. पाटील ,श्रीम.हेमलता भोसले, श्रीम. मंदाकिनी चौधरी ,सौ. स्वाती महाजन या शिक्षक शिक्षिकांचा व सौ. आशा राजपूत व श्री. मीना हिवरे यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
जि.प.शाळा आता आपले रुप पालटत आहेत शिक्षक सुध्दा मेहनत घेत असून त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. तालुक्यातील जवळजवळ सर्व शाळा गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या प्रेरणेतून , सर्व शिक्षक व लोकसहभागातून डीजीटल झाल्याचा आनंद मला होत आहे. खऱ्या अर्थाने शिक्षक नवीन तंत्रज्ञान अवगत करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत आहेत .मी पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व जि.प. शाळांना येत्या पंधरा दिवसात प्रत्येकी एक स्मार्ट टिव्ही मंजूर केले असून लवकरच मिळतील आणि या कन्या शाळेसाठी १ते ७वी वर्गांसाठी सात स्मार्ट टिव्ही संच देण्याचा मी प्रयत्न करतो असा मनोदय किशोरअप्पा यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आणि सर्व दात्यांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार मानले
आपल्या प्रास्ताविकातून गुलाबराव पाटील यांनी सर्व दानशूर व्यक्तीचे व्यक्तीशः ऋण व भरभरुन अंत:करण पूर्वक आभार मानले.
कार्यक्रमासाठी मा. उपनगराध्यक्ष गणेशजी पाटील, नवनेतृत्व सुमित पाटील,शिक्षण वि.अ. अण्णासो समाधान पाटील व केंद्रप्रमुख अण्णासो सुधाकर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. आहिरे सर व आभार श्रीम. मीना हिवरे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन श्री.आर.डी.पाटील,श्रीम. मंगला वाणी मॅडम यांनी केले







