Maharashtra

जलसंवर्धन…मन संवर्धन… दहिवद गाव झाले जलमय… युवानेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते जलपूजन

जलसंवर्धन…मन संवर्धन… 
 दहिवद गाव झाले जलमय…
 युवानेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते जलपूजन

जलसंवर्धन...मन संवर्धन... दहिवद गाव झाले जलमय... युवानेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते जलपूजन

चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे
दहिवद गावाने नवा इतिहास घडवत मे महिन्यामध्ये गावातील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जमा केलेला निधी गावातील तलाव खोलीकरणासाठी वापरला. यावेळी मे महिन्यात युवा नेते मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे तलाव खोलीकरणासाठी पोकलँड मशीन देण्यात आले होते. तब्बल 1 महिना हे मशीन चालले व गाळ काढण्याचे काम सुरू होते. तलावाची क्षमता वाढल्याने यावेळी तलाव पूर्ण क्षमतेने भरला. दहिवद गावाची पाणी टंचाई लक्षात घेता जल तज्ञ शिरपुर पॅटर्न चे जनक खानापूरकर साहेब यांच्या सुचनेने  पुढच्या जानेवारी महिन्यात हे तलाव अजून 15-20 फूट खोल करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं या तलावाच्या जलपूजनाच्या वेळी युवानेते मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
या जलपूजनावेळी युवानेते मंगेश चव्हाण, भिमरावनाना पवार ,भिमराव खलाणे, प्रभाकरभाऊ चौधरी, हिम्मत निकम, गोरख पवार, नवल पवार, संतोष पवार, दिगंबर पवार,आबा पवार, हेमराज पवार, प्रतिक भोसले, भूषण साळुंखे, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल, जगदीश चव्हाण, सुधाकरआबा वाघ ,चिंधा वाघ, दत्तू भाऊसाहेब, राजेंद्र पवार,आण्णा कोळी, भैय्या बहिरम, जितेंद्र पवार, कल्याण खलाणे, दादा न्हावी, प्रविण पवार, शांताराम पवार, सनी पवार, लखन मोरे, योगेश पवार यांची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button