जलयुक्त अंतर्गत बंधाऱ्यांच्या गैरव्यवहाराची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करा
भाजपाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर-
तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट बंधाऱ्याची कामे अंत्यत नित्कृष्ठ दर्जाची झाली असून अनेक बंधाऱ्यांना पहिल्या पावसातच गळती लागली आहे, हा मोठा गैरव्यवहार असल्याने याची लाचलुचपत विभागाच्या वतीने चौकशी करावी या मागणीचे निवेदन अमळनेर भाजपच्या वतीने अमळनेर प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.
भाजपा शहराध्यक्ष शितल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.यात म्हटले आहे की कृषी विभागांतर्गत सिमेंट बंधाऱ्यांसह बांध बंदिस्ती, खोलीकरण आदींची कामेहीनिकृष्ट दर्जाची झाली आहेत.केवळ बिले काढून मलिदा लाटण्यासाठीच ही कामे झाली असल्याचे स्पष्ट झाले असल्याने विधानसभा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या आदेशानुसार अमळनेर तालुक्यातील जलयुक्त कामांच्या गैरव्यवहाराची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करावी,तसेच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यातील अनेक गावांत जुने सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती व खोलीकरणाच्या नावाने फक्त आजूबाजूला मातीचा भराव करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. ग्रामस्थानी काम सुरू असताना संबंधित अधिकारी, ठेकेदारास वारंवार निकृष्ट काम होत असल्याबाबत निदर्शनास आणून दिले होते. मात्र, तरीही त्यांनी हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ही सर्व जबाबदारी कृषी विभागाची असून, अधिकारी, कृषी सहायक व पर्यवेक्षकांनी याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करून आपणास काही देणेघेणे नाही व आपले काहीही बिघडणार नाही अशी भूमिका घेतली आहे.यामुळे तहसीलदारांनी देखील लक्ष घालून या सर्व कामांची चौकशी करावी ही संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे. तसेच अमळनेर येथील अनेक कृषी सहाय्यकांनीच तालुक्यातील जलयुक्तच्या कामांचे ठेके घेतल्याची ओरड शेतकऱ्यांमध्ये असून काही कृषीसहाय्यकानी नातेवाइकांच्या नावाने ठेके घेऊन जेसीबी आदी माशीनरीचे आवास्तव बिल कृषी विभागाशी संगनमत करून लाटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे अशा कृषी सहाय्यकांची यादी तयार करून वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी आणि निकृष्ट कामांबाबत बिले रोखून कठोर शासन करावे अशी मागणी यात केली आहे.निवेदनावर भाजप सरचिटणीस जिजाबराव पाटील,अनिल जैन,दिलीप ठाकूर,चंद्रकांत कंखरे,किर्ती पाटील,गोकुळ परदेशी,राजेश वाघ,शेखर कुलकर्णी,समाधान पाटील,मुन्ना कोळी,रवी देशमुख,दीपक पाटील,सौरभ पाटील,वाल्मिक पाटील,देवा लांडगे,जितेंद्र पाटील आदींच्या सह्या आहेत.







