चोपडा विधानसभेचे इच्छुक उमेदवारांचे जनसंपर्क अभियानाला सुरुवात…
चोपडा (प्रतिनिधी)- सचिन जयस्वाल
चोपडा : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूका काही महिन्यावर आले असतांना संपुर्ण राज्यातील मतदारसंघ नियाय राजकीय पक्ष चाचपणी करीत असल्याने उमेदवार देखिल आपापल्या मतदार संघात जनसंपर्क अभियान राबविताना दिसत असले तरी चोपडा मतदारसंघात मात्र ईच्छुक उमेदवारांची संख्या कमालीने वाढतांना दिसत आहे.
चोपडा विधानसभा मतदार संघ हा सन २००९ पासून अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्या नंतर जगदिशचंद्र वळवी हे राष्ट्रवादी काँग्रेस कडुन निवडुण आले होते. परंतू सन २०१४ मध्ये त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करून भाजपाच्या तिकीटावर निवडणुक लढविल्याने त्यांचा पराभव झाला होता तर शिवसेनेचे प्रा चंद्रकांत सोनवणे हे निवडुन आले होते.तर राष्ट्रवादीचे माधुरी पाटील दोन नंबरवर होते मात्र डॉ. चंद्रकांत बारेला यांनी अपक्ष निवडणुक लढवुन तिस हजारावर मतदान त्यावेळी घेतले होते तर राष्ट्रीय पक्ष काँग्रेसचे उमेदवाराला दहा हजार मत मिळाले होते.
येणाऱ्या दोन महिन्यावर राज्याचे विधानसभाची निवडणूक आली असल्याने चोपडा मतदार संघात आ.प्रा चंद्रकांत सोनवणे हे गेल्या साडेचार वर्षात केलेल्या विकास कामांचा जोरावर मतदारांशी संवाद साधुन गाठीभेटी सुरू केली आहे तर यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तिकीटावर माजी आ. जगदिशचंद्र वळवी निवडणुक लढविणार असल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकी पासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावर जाऊ लागले आता तर तालुक्यात विविध कार्यक्रमाला हजेरी लाऊन नागरीकांची भेटी घेत आहेत तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तिकीटावर गेल्या वेळी निवडणुक लढविणारे माधुरी पाटील हे देखिल तालुक्यात नागरीकांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधत आहेत तर भाजपा कडुन प्रभाकर सोनवणे हे इंच्छुक असल्याने त्यांनी तालुक्यात संपर्क वाढविला आहे तसेच गोविंद सैंदाणे हे ही भाजपाच्या तिकीटावर लढण्यासाठी इंच्छुक असल्याने त्यांनी देखिल तालुक्यात जनसंपर्क अभियानाला सुर्वात केली आहे
तर बहुजन वंचित आघाडीकडुन सौ अरूणा संजीव बाविस्कर हे इच्छुक असल्याने त्यांनी नुकतेच उमेदवारीसाठी मुलाखत देऊन आले आहेत गेल्यावेळी अपक्ष निवडणुक लढवुन तिस हजारावर मतदान घेऊन राजकीय पक्षातील उमेदवारांना टक्कर देणारे डॉ.चंद्रकांत बारेला यांनी संपुर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे त्यांनी अजून तरी कोणत्या पक्ष कडुन निवडणुक लढविणार हे जरी जाहिर केले नसलं तरी गेल्या वेळच्या अनुभवावरून अपक्ष निवडणुक लढवितील असे वाटत आहेत.







