चोपडा नगर पालिका कर्मचारी यू.बी खेवलकर यांना सुनील दहिवेलकर या ठेकेदार कडून मारहाण करण्याची धमकी
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
येथील नगर पालिकेच्या कर्मचारी यू.बी. खेवलकर यांना सुनील उखाराम दहिवेलकर रा.चोपडा यांनी दि.०४/०७/२०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता नगर पालिकेच्या पाणी पुरोठा विभागात येऊन शासकीय कामात अडथळा आणून कारण नसताना अर्वाच भाषेत शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली आहे खेवलकर हे अपंग कर्मचारी आहेत त्यांना मिळालेल्या धमकी मूळे ते दहशतीखाली आहे. दि.०५/०७/२०१९पासून जो पर्यंत ठेकेदारावर कायदेशीर कार्यवाही होत नाही तो पर्यंत नगर पालिका कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले .








