? आताची मोठी बातमी..आज रात्री 12 वाजल्यापासून पहा Netflix फ्रीमध्ये …Netflix ने आणली युजर्स साठी खास ऑफर..पहा काय आहे ऑफर..
नेटफ्लिक्सने आपल्या युजर्ससाठी एक खास ऑफर आणली आहे. त्यानुसार युजर्स या वीकेंडला चक्क फ्री स्ट्रिमिंगचा फायदा घेऊ शकणार आहेत.
- पहा नेमकी ऑफर काय?
अमेरिकन कंटेन्ट स्ट्रिमिंग कंपनी 5 आणि 6 डिसेंबर रोजी एका स्ट्रिमफेस्टचं आयोजन करणार आहे. त्याअंतर्गत हि ऑफर आहे. त्यामुळे ज्या युजर्सकडे नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन नाही, अशा लोकांना या स्ट्रिमफेस्टद्वारे नेटफ्लिक्स कंटेन्ट फ्रीमध्ये अॅक्सेस करण्याची संधी मिळणार आहे.
आज रात्री 12 वाजल्यापासून नेटफ्लिक्स फ्रीमध्ये वापरता येणार आहे. हा फ्री ऍक्सेस 6 डिसेंबरपर्यंत असणार आहे. यावेळी कोणतेही क्रेडिट कार्ड किंवा पेमेंट डिटेल्स द्यावे लागणार नाही.
- ऑफरमागील उद्देश..
अधिकाधिक लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणणे.
भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत नव्या ग्राहकांना जोडणे.
आपला युजर बेस वाढवणे.
- कस पहाल मोफत ..
5 डिसेंबर रात्री 12 वाजल्यापासून 6 डिसेंबर रात्री 12 पर्यंत भारतातील ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स मोफत उपलब्ध असणार आहे.
जरकडे नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन नसल्यास युजर नाव, ईमेल आयडी, फोन नंबर आणि पासवर्डसह नेटफ्लिक्सच्या वेबसाईट किंवा अॅपवरून साइनअप करू शकतात.
या स्ट्रिमिंग फेस्टमध्ये एकदा रजिस्टर्ड केल्यानंतर स्मार्ट टीव्ही, गेमिंग कंसोल, अॅपल, अॅन्ड्रॉईड अॅप किंवा वेबवर नेटफ्लिक्सवरच्या सर्व गोष्टी पाहता येणार आहेत.
स्ट्रिमफेस्ट सुविधेद्वारे स्टँडर्ड डेफिनेशन सिंगल स्ट्रिमिंगची सुविधा मिळणार आहे.






