?️ Big Breaking.. लॉक डाऊन 4 ची घोषणा..31 मे पर्यंत वाढला लॉक डाऊन…
पी व्ही आनंद
मुंबई – देशातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने परत एकदा राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असून 18 मे ते 31 मे पर्यंत देशात लॉकडाऊन कायम राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या घोषणेप्रमाणे 17 मे पर्यंत लॉकडाऊनची मुदत आहे. आता पुन्हा लॉकडाऊनची मुदत दोन आठवड्यांनी वाढविण्यात आली आहे. राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत कायम राहणार आहे. याचबरोबर या लॉकडाऊन दरम्यान रेड, ग्रीन आणि ऑरेज झोनमध्ये कोणत्या उपाययोजना हाती घ्याव्यात, याबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली जाणार आहेत.
रेड झोन (हॉटस्पॉट क्षेत्र) सवलत नाही
कोरोनाच्या हॉटस्पॉट क्षेत्रात कोणतीही सवलत दिली जाणार नाही. या भागात आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. तसेच, कोणालाही बाहेर पडू दिले जाणार नाही. जीवनावश्यक वस्तूंची होम डिलीव्हरी केली जाईल. त्या भागाच्या सुरक्षा क्षेत्रात व्यस्त असलेले कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचार्यांना फक्त परवानगी राहिल.
ज्या भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत, त्यांना सवलत मिळू शकते. नियमितपणे या भागांचा आढावा घेवून काही भागात थोडी सवलत दिली जाईल. सवलत देण्यापूर्वी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्त्वाचे अनुसरण करण्यासाठी सर्व उपाय केले जातील, जेणेकरून कार्यालय, कार्यस्थळ, कारखाने किंवा संस्थांमध्ये सामाजिक अंतर कायम ठेवले जाईल.






