Maharashtra

घोटविहिरा येथील नैसर्गिक आपत्तीमुळे स्थलांतरीत नागरिकांना नाशिक वरून पोहचले तयार जेवण*

*घोटविहिरा येथील नैसर्गिक आपत्तीमुळे स्थलांतरीत नागरिकांना नाशिक वरून पोहचले तयार जेवण*

घोटविहिरा येथील नैसर्गिक आपत्तीमुळे स्थलांतरीत नागरिकांना नाशिक वरून पोहचले तयार जेवण*

गांडोळे, ता दिंडोरी प्रतिनिधी दीपक भोये
 पेठ तालुक्यातील घोटविहिरा या ग्रामपंचायत मधील उंबरमाळ या गावालागत सोमवार (दि.५) रोजी सायंकाळी भूकंपाचे धक्के मुळे रस्त्याला व डोंगराला मोठ्या प्रमाणात तडे पडले होते. प्रशाशनाने स्थानिक ठिकाणी भेट देऊन उंबरमाळ गावातील नागरिकांना दुसऱ्या गावात हलविण्यात आले आहे.
  या स्थलांतरीत नागरिकांसाठी देवदूत म्हणून सचिन बोधले पुढे धावून आले आहेत. बोधले यांनी पेठ व सुरगाणा तालुक्यात आपत्ती जनक परिस्थिती मुळे स्थलांतरित नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यातून त्यांना पेठ मधील घोटविहिरा येथील नागरिक हलविण्यात आले असून त्यांना अन्नाची गरज आहे, असे समजले. रामदास शिंदे, दीपक भोये, विजय देशमुख यांचा सहारा घेत घोटविहिरा येथील नागरिक नंदराज चौधरी यांच्याशी संपर्क साधला अन नंदराज आपल्या भागातील गाडी घेऊन नाशिक गेला होता.
 चाळीस नागरिकांसाठी तयार जेवण सुगरण कॅटरिंग सेवाचे श्री व सौ जोशी, दिव्या फाऊंडेशनचे सुयोग कुलकर्णी, समिर देशमुख, डॉक्टर शैलेंद्र गायकवाड तर्फे तर साठ नागरिकांसाठी कोरडा शिधा सौ. उजवला बोधले आणि राजू नाईक यांच्या कडून देण्यात आले.  हे तयार जेवण व कोरडा शिधा ग्रामस्थ नंदराज चौधरी यांच्याकडे सुपूर्द करीत वाहनाचे (MH१५E१४६८) गाडी भाडे दोन हजार रु देण्यात आले आहे. अशा सामाजिक कार्यांचे सर्वच स्थरातून सुगरण कॅटरिंग सेवा, दिव्या फाऊंडेशन व सचिन बोधले यांचे कौतुक होत आहे.

घोटविहिरा येथील नैसर्गिक आपत्तीमुळे स्थलांतरीत नागरिकांना नाशिक वरून पोहचले तयार जेवण*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button