India

खरा मर्यादापुरुषोत्तम राजा रावण दहन योग्य की अयोग्य

खरा मर्यादापुरुषोत्तम राजा रावण दहन योग्य की अयोग्य

संपादकीय प्रा जयश्री साळुंके
भारतीय संस्कृती प्रमाणे नऊ दिवस देवीची प्रतिष्ठापना केल्या नंतर विजया दशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो.

  • योगायोग म्हणजे याच दिवशी रामाने राजा रावण यांचा वध ही केला.
  • तिसरा योगायोग म्हणजे याच दिवशी महाभारतातील पांडवानी शमी च्या झाडा वरील आपली लपवून ठेवलेली शस्त्रे मिळवली आणि युद्धासाठी तयार झाले.एकाच दिवशी बरेच योगायोग फक्त भारतीय संस्कृतीतच शक्य आहेत.अनेक पौराणिक कथा सांगून या दिवसाला जास्तीत जास्त धार्मिक पौराणिक बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
  • त्यातील सर्वात मोठी दंतकथा आहे ती म्हणजे रामाने केलेला रावणाचा वध… ही परंपरा मोठ्या श्रद्धेने पूर्ण केली जाते. एका बाजूला इतिहास कारांमध्ये रामायण महाभारत कालखंड अस्तित्वात असल्या बद्दल अनेक मतभेद आहेत.
  • या दंतकथाना जर मानले तर राजा रावण हा एक आदिवासी( द्रविड) राजा होता.त्याच रूप पौराणिक मालिकांमध्ये दाखविल्या प्रमाणे नसून अत्यन्त सुंदर (जसे रामाला दाखविले आहे ),शक्तिशाली मूळ आदिवासी राजा होता.जो आर्य नसून अनार्य होता.त्याला काही दहा तोंड वै नसून तो मूळ आदिवासी प्रमाणे उंच,धिप्पाड,रंगाने सावळा किंवा काळा असा होता.अत्यन्त शूर, पराक्रमी,शिव

भक्त असलेला रावण तितकाच तत्वज्ञानी
देखील होता. मानववंश शास्त्राप्रमाणे

संपुर्ण जगात आदिवासी बांधवांची खास

विशिष्ट शरीराची ठेवण आहे.मेंदूच्या
कवट्या ची खास ठेवण आहे.म्हणूनच

आदिवासी हे इतर समाज घटकां पासून

वेगळे आहेत.

  • आर्य हे परकीय असून ते मध्य आशियातून भारतात आले होते हे इतिहास संशोधक यांनी सिद्ध केले आहे. ते गोरे पानउंच होते .आर्य आणि अनार्य यांच्यात अनेक संघर्ष झाले.
  • स्थानिक राजा रावण याने आर्यांना विरोध केला. रामाचा भाऊ लक्ष्मण याने प्रथम रावणाची बहीण हिची आगळीक केली. शुद्ध भाषेत सांगायचे म्हणजे तिचे नाव घेतले, तिला चिडवले.याचा कोणत्याही भावाला राग येणे स्वाभाविक आहे. तो राग रावणाला आला आणि सीतेच अपहरण करून अशोक वाटिकेत ठेवलं परंतु संयमी राजा रावणाने एकदाही सीते कडे वाईट नजरेने पाहिले नाही .आणि जबरदस्ती देखील केली नाही.एका स्त्रीचा सन्मान कसा करावा याच उत्कृष्ट उदा समोर ठेवलं.
  • शुपर्णाखेच नाव घेणारा लक्ष्मण,सीते ला परत आणून वनात पाठविणारा राम हे आदर्श कसे मानावे?बहिणीची रक्षा करणारा,परस्त्री ला आदराने वागविणारा रावण मात्र जाळायचा?
  • आज सम्पूर्ण देशात महिलांवर विविध अत्याचार होतात,बलात्कार होतात,जिवंत जाळले जाते,छेडछाड केली जाते, अश्लील छायाचित्रे प्रकाशित केले जातात, सोशल मीडियायाद्वारे अपमान केला जातो,ऍसिड फेकले जाते,अश्या विविध प्रकारांमुळे देशातीलस्त्री सुरक्षित नाही.तिला सुरक्षा प्रदान करणारा राजा रावण आपण जळतो आणि कोणत उदा तरुणांसमोर ठेवत आहोत याचाही विचार होणे आवश्यक आहे. जर तुम्ही बलात्कार करणाऱ्या ,स्त्री वर अत्याचार करणारया दोषींना आजही चौकात शिक्षा देऊ शकत नाही त्यांना जाळू शकत नाही तर राजा रावणाला जाळण्याचा अधिकार कोणी दिला.
  • महाराष्ट्रातील आदिवासी बांधवानी विविध ठिकाणी राजा रावण ला जळणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल केले असून आताही राजा रावण यांचं दहन करणाऱ्या व्यक्तीं वर कायदेशीर कार्यवाही केली जाईल.विशेष म्हणजे रावण दहन कार्यात शासकीय कर्मचारी,अधिकारी देखिल सहभागी होतात कृपया असे न करता आपल्या कडे नेमका कोणत्या परंपरे नुसार आपण रावण दहन करत आहेत ते ही स्पष्ट करावे.मानव अधिकार नियमानुसार देखील रावण दहन कायद्याच्या चौकटीत बसत नाही.
  • कोणा एका व्यक्तीला मेल्या नंतर पुन्हा वर्षानुवर्षे न केलेल्या गुन्ह्या बद्दल जाळत राहणे हे तर्क संगत नसून माणुसकीच्या दृष्टीने दखिल हीन विचार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button