Maharashtra

उमंग सम्राज्ञी 2019 चे मानकरी योगिता छाजेड

उमंग सम्राज्ञी 2019 चे मानकरी योगिता छाजेड 
पूजा जोशी आणि कीर्ती शिंपी ठरल्या उपविजेत्या
उमंग सम्राज्ञी स्पर्धेतून महिलांच्या आत्मविश्वासाला बळकटी : संपदा पाटील

उमंग सम्राज्ञी 2019 चे मानकरी योगिता छाजेड


 उमंग सम्राज्ञी स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : क्षणाक्षणाला महिलांचा जल्लोष
 चाळीसगाव — प्रतिनिधी नितीन माळे
येथील उमंग महिला समाज शिल्पी परिवाराच्यावतीने आज उमंग सम्राज्ञी 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उमंग सम्राज्ञी 2019 ही स्पर्धा यंदा सामाजिक संदेश, कौटुंबिक योगदान, आत्मविश्वास, विविध कला आणिअंगभूत कौशल्य या विषयांना समर्पित होती.या स्पर्धेमध्ये क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत गेली. अखेर योगिता छाजेड यांनी  उमंग सम्राज्ञी 2019 मान पटकावला.तर पूजा जोशी आणि योगिता शिंपी खैरनार यांनी उपविजेते पदक पटकावले यावेळी महिलांनी एकच जल्लोष करीत विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्र गोवा सौदर्यसम्राज्ञी रिणी शर्मा यांच्या हस्ते योगिता छाजेड यांना मानाची पैठणी, ताजमुकुट व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

उमंग सम्राज्ञी 2019 चे मानकरी योगिता छाजेड

शहरातील उमंग समाज परिवाराच्या वतीने आज भूषण मंगल कार्यालयात दुपारी दोन वाजता या रंगारंग उमंग सम्राज्ञी 2019 स्पर्धेला सुरुवात झाली गोवा महाराष्ट्र सौंदर्यसखी सम्राज्ञी पुरस्कार विजेत्या रिनी शर्मा, नाशिक येथील सौंदर्य तज्ञ भारती  जाधव यांच्या परीक्षणात ही स्पर्धा संपन्न झाली.यावेळी पंचायत समितीचे सभापती स्मितल बोरसे ,ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.सुनीताताई घाटे, स्वयंदीप परिवाराच्या सर्वेसर्वा मीनाक्षीताई निकम,  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेघा बक्षी,  रंग कला सक्त न्यास च्या डॉ. मीनाक्षी करंबळेकर, महिला मंडळ अध्यक्षा उज्वला ठोंबरे, साधना पाटील, ज्योती बडगुजर, रेखा जोशी, महानंदा कटतकल, गेल्यावर्षी 2018 च्या सम्राज्ञी मनीषा बोरसे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
 यावेळी उमंग समाजशिल्पी परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घ्यावी, त्यांच्यातील सुप्त कलागुणांनासह त्यांचे व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी  तसेच गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी ही उमंग सम्राज्ञी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. विविध सामाजिक संदेश देत स्पर्धकांनी  स्पर्धेतून आपल्या विविध कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे याचा आनंद आहे.
स्पर्धकांमध्ये मोठी चुरस
उमंग सम्राज्ञी 2019  स्पर्धेसाठी माया सावंत, वर्षा अग्रवाल, सुवर्णा येवले, कीर्ती शिंपी, हेमलता शर्मा, पूजा जोशी, प्रमिला जोशी, शोभा अग्रवाल, योजना पाटील , नयना महाजन, शर्मिला निंभोरे, कस्तुरी जोशी, अनिता शेळके, पूजा लद्दे,सरला येवले, ज्योती गवळी, मोना भामरे, डॉ.विषाखा राठोड, उषा पाटील , नलिनी पाटील, रुपाली ब्राह्मणकर, मनीषा मालपुरे ,ज्योति भामरे, संध्या गुप्ता, माया शर्मा, भारती लोढा या, बेबी कुमावत, विजया ब्राह्मण कार, श्रद्धा देशपांडे, सुनंदा चव्हाण, चारुशीला कळसे, वैशाली निकम आदी महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
विविध कलांचे सादरीकरण
   उमंग सम्राज्ञी 2019 स्पर्धेसाठी सुमारे चाळीस महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला यामध्ये पथनाट्य नाट्यछटा, नृत्य, भजन, गायन, लावणी, गाणे, नाटक ,भारुड, एक पात्री प्रयोग ,किर्तन यासारख्या विविध प्रकारांतून आपले अंगभूत गुण कलागुण सादर केले शेवटी योगिता छाजेड, कीर्ती शिंपी खैरणार,पूजा जोशी या तीन स्पर्धकांमध्ये सम्राज्ञी पुरस्काराची चुरस दिसून आली अखेर परीक्षक रीनी शर्मा व भारती जाधव यांनी  उमंग सम्राज्ञी 2019  पुरस्कारासाठी योगिता छाजेड यांची निवड केली. पूजा जोशी व कीर्ती शिंपी खैरनार यांना उपविजेते पुरस्कार देण्यात आला . संपदा पाटील यांच्या शुभहस्ते त्यांना सोनेरी मुकुट,पैठणी व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सहभागी सर्वच स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेसाठी सुवर्णाताई राजपूत, विजया पाटील, दामिनी वाघ, पूजा महाजन आदींनी  परिश्रम घेतले. स्पर्धा सुमारे पाच तास चालली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button