चोपडा – प्रतिनिधी सचिन जयस्वाल
तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ईनरव्हील क्लब ऑफ चोपडा तर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच क्लबच्या सदस्यांनी या विद्यार्थ्याना खाऊ देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.
याप्रसंगी मंचावर क्लबच्या प्रेसिडेंट डॉ. कांचन टिल्लू, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सौ अश्विनी गुजराथी, सदस्या सौ. सीमा पाटील, नीतू अग्रवाल, किरण पालीवाल, उज्ज्वला जैन या उपस्थित होत्या.
याप्रसंगी केंद्रप्रमुख सौ. मीनाक्षी गाजरे, शिक्षिका सौ. भारती हिरे, सौ. प्रतिभा ठाकरे, सौ. ज्योती भावसार, सौ. प्रतिभा पाटील, सौ. आशालता महाजन, सौ. पांडव या उपस्थित होत्या. शालेय विद्यार्थ्यांनी सुंदर स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले.
@’रंगीला सावन ‘ उपक्रमाचे आयोजन@
ईनरव्हील क्लब ऑफ चोपडा तर्फे ‘ रंगिला सावन ‘ या धमाकेदार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्याच्या प्रसन्न वातावरणात १० ऑगस्ट रोजी महिलांसाठी एकल नृत्य, समूह नृत्य, फॅशन शो या विविध कलादर्षनपर स्पर्धांचे १८ किवा त्यातील मुली, महिलांसाठी आयोजन करण्यात आले आहे. १० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता न. पा. नाट्यगृहात होणाऱ्या या स्पर्धांसाठी व माहितीसाठी सौ. अश्विनी गुजराथी, डॉ. कांचन टिल्लू, सौ. चेतना बडगुजर, सौ. चंचल जैस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







