आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी जळगावात सुरु केली चाचपणी, जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न….
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
नुकतेच वाजता पद्मालय विश्राम गृह येथे आम आदमी पार्टीची जिल्हास्तरीय विधानसभा निवडणूक आढावा बैठक संपन्न झाली.
जिल्हास्तरीय विधानसभा निवडणूक आढावा बैठकीस उत्तर महाराष्ट्र सचिव अॅड. प्रभाकर वायचळे व महाराष्ट्र राज्य युवा आघाडीचे राज्य उपाध्यक्ष स्वप्निल घिया हे उपस्थित होते.
सदर बैठकीस माननीय अॅड. प्रभाकर वायचळे व स्वप्निल घिया यांनी विधानसभा निवडणूक आढावा बैठकीस योग्य मार्गदर्शन केले. या बैठकीस जिल्हाभरातून कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. अॅड. प्रभाकर वायचळे व स्वप्निल घिया यांनी आम आदमी पार्टीची विचारधारा, निवडणूकीची नवी दिशा व आशा दिली. या आशेतून कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळाले.
तसेच कार्यकर्त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात पक्षाची पुनःबांधणी करण्याची आशा व्यक्त केली. जिल्हास्तरीय पक्ष बांधणी बाबत अॅड. प्रभाकर वायचळे यांनी युवा जिल्हाध्यक्ष रईस खान व महानगरउपाध्यक्ष योगेश हिवरकर यांच्याशी चर्चा केली.कार्यकर्त्यांशी हितगुज करून जळगावजिल्हास्तरीय विधानसभा निवडणूक लढविणे बाबत सखोल चर्चा केली. व कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करून उमेदवार देणे बाबत सखोल चर्चा करण्यात आली.इच्छुकांकडून नावे मागविण्यात आली तसेच कार्यकर्त्यांची मते व अडचणी जाणून घेण्यात आले.
या बैठकीस उत्तर महाराष्ट्र राज्य सचिव अॅड. प्रभाकर वायचळे , राज्य युवाउपाध्यक्ष स्वप्निल घिया, युवा जिल्हाध्यक्ष रईस खान , महानगरउपाध्यक्ष योगेश हिवरकर, युवा जिल्हाउपाध्यक्ष पुरुषोत्तम भालेराव, एरंडोल तालुकाध्यक्ष उज्वल पाटील, विवेक गुर्जर तसेच अश्पाक पिंजारी, अंजुम रजवी, डॉ. शरीफ शेख, अनिल वाघ सर, प्रा. डॉ आशिष जाधव व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.







