आमदार शिरीष चौधरी यांनी एकाच बैठकीत निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे निकालात काढून निराधार आणि सामान्य जनतेला दिला आश्चर्यकारक सुखद धक्का….
अमळनेर प्रतिनिधी
सर्वसामान्य जनतेच्या साधारण प्रश्नां संदर्भात लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात असा अनुभव साधारणपणे वेळोवेळी येतो. परंतु या अनुभवास पूर्णपणे मोडीत काढून आमदार शिरीष चौधरी यांनी सामान्य जनतेच्या निराधार योजनेच्या समस्या जाणून घेऊन एकाच बैठकीत तब्बल 2786 प्रकरणे जागेवर मंजूर करून आर्थिक पिडीत लाभार्थ्यांना असलेल्यांना आश्चर्य कारक सुखद धक्का दिला.यानिमित्ताने प्रशासन देखील गतिमान झाले याचाही अनुभव लाभार्थ्यांना आला.
संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांची बैठक आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आलेली होती.या बैठकीत प्राप्त झालेली सर्व प्रकरणे येथेच मंजूर झाली पाहिजेत अशा सूचना आ. चौधरी यांच्या असल्याने त्यादृष्टीने प्रशासन देखील तयारी केली होती.सदर बैठकीत संजय गांधी योजना 340, श्रावण बाळ योजना 2022, इंदिरा गांधी योजना 424 असे एकूण 2786 प्रकरणे मंजूर करण्यात आले.विशेष म्हणजे प्राप्त झालेली काही प्रकरण अपूर्ण किंवा त्रुटी असलेल्या प्रकरणांना देखील पूर्ण करून मंजूर करण्यात आले.बैठकीत आमदार शिरीष चौधरी सह तहसीलदार ज्योती देवरे व संबंधित अधिकारी तसेच समितीचे सदस्य देखील उपस्थित होते.
तहसील आवारात असलेल्या निराधार योजनांची प्रकरणे मंजूर करून देण्यासाठी अनेक जण दलाल कार्यरत होते.सामान्य जनतेला पैसे खर्च करून ही प्रकरणे मंजूर होत नव्हती.यामुळे सामान्य जनता जेरीस आलेली होती.सर्वसामान्यांची ही लूट थांबविण्यासाठी आमदार चौधरी यांनी ही बैठक लावून संबधित लाभार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना केल्या त्यामुळे अर्ज सादर करणारे सर्व लाभार्थी आवर्जून उपस्थित राहिले.आमदार शिरीष चौधरी यांनी देखील त्यांच्या समक्ष सर्व प्रकरणे मंजूर करून आपण खरे जनतेचा सेवक असल्याचा अनुभव जनतेला दिला.प्रथमच अश्या प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात निराधार योजनेची प्रकरणे एकाच बैठकीत मंजूर झाली आहेत यामुळे आ चौधरींचे विशेष कौतुक होत आहे.








