Maharashtra

आमदार ताईंची गर्जना की कोल्हेकुई…. घुंगट की आड से हिरवी कामगिरी का दीदार नजर आता है…

आमदार ताईंची गर्जना की कोल्हेकुई….
घुंगट की आड से “हिरवी कामगिरी” का दीदार नजर आता है…
पत्रक काढायला विकासाचे मुद्दे नाहीत म्हणून अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न 

आमदार ताईंची गर्जना की कोल्हेकुई.... घुंगट की आड से हिरवी कामगिरी का दीदार नजर आता है...

अमळनेर प्रा .जयश्री सााळुंके

अमळनेर येथील विधान परिषद आमदारांनी नुकतेच एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे त्यात त्यांनी पोलीस प्रशासनावर निशाणा साधून राजकीय गोळी चालविण्याचा प्रयत्न केला. पण अमळनेर शहरातील अवैध धंदे हे काल परवा निर्माण झालेले नाहीत.संत सखाराम महाराज आणि पूज्य साने गुरुजींची उदा. देत सामान्य जनतेच्या नजरेत पोलीस प्रशासनाचा धाकच तुम्ही प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून काढून घेत आहात.फार आधीपासूनच असे व्यवसाय शहरात सुरू आहेत.याआधी हे मुद्दे का दिसले नाहीत? निवडणुकीच्या तोंडावर आपल्याकडे बोलायला काहीच नाही विकासाचे मुद्दे नाहीत जे दोन चार दाखविले जातात ते ही याचे त्याचे ओढून ताणून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेला दिसतो.कुठेतरी विधान परिषद आमदार अमळनेरच्या सामान्य जनतेची किती काळजी घेतात हे दाखविण्याचा हा प्रयत्न असून आपल्या दिव्या खाली किती अंधार आहे हे ही एकदा तपासावे.आपली “हिरवी अवैध कामगिरी”जळगांव जिल्ह्यातील सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे आपण “त्या”विषयावर पत्रक काढून बोलणं म्हणजे “दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण” अशी गोष्ट आहे .यातून घुंगट की आड से . . स्पष्ट होते.गावातील चर्चे प्रमाणे   मागील पोलीस निरीक्षकांनी    अवैध धंद्याची चिरीमिरी ची व्यवस्था केली होती अशी शहरात चर्चा आहे बहुतेक ही चिरीमिरी बंद झाली म्हणून तर हा तीळ पापड होत नाही ना???अवैध धंदे शोधणे,लग्न,मौत,समारंभ यांना जाणे म्हणजे लोकप्रतिनिधीत्व नव्हे तर विकास कामे किती केली त्यावर पत्रके काढणे,किती निधी मंजूर केला,शासना पर्यंत  तालुक्यातील किती विषय पोहचविले,दुष्काळ ग्रस्त शेतकरी वर्ग त्यांच्या समस्यांना किती वाचा फोडली, अमळनेर शहरातील अति संवेदनशील विषय हाताळले याला महत्व आहे.प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आपल्या पदाचा दबाव आणून त्यांना काम न करू देणे,हतबल करणे,त्यांचे मनोबल खच्चीकरण करणे  म्हणजे कार्य नव्हेे….
   तर आमदार ताईंनी  अमळनेरचे आमदार शिरीष दादा यांनी सुतगीरणीच्या उदघाटन दरम्यान सुतोवाच केले की जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या अमळनेर तालुक्यात झाल्या आहेत. त्यावर आमदार स्मिता वाघ यांनी कधी शेतकरी कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळवण्या साठी आंदोलन  वा गर्जना केली नाही,आत्महत्या शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची सोय केली नाही.
       पिंगळवाडे बंधारा लीक झाला त्यांच्या निकटवर्ती शीतल देशमुख यांनी तक्रार देत कृषिखात्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर ताशेरे ओढले पण पुढे काय झाले ?ताई यावर गर्जना करत नाही.सरकारला निकृष्ट कामा संदर्भात  2 ओळींचे पत्र लिहले नाही.
 मागील वर्षी अमळनेरातील 9 मंडळ पैकी फक्त शिरूड मंडळ यांना विमा पास होऊन शेतकारी बांवाना लाभ झाला, बाकी ८ मंडळ विमा पासून वंचित राहिले तेंव्हा आंदोलन केले नाही.
भोरटेक येथील मातीचा बंधारा वाहून गेला तेंव्हा शेतकरी हितासाठी गर्जना केली का?त्यावर कृषी असो वा संबधीत खात्यास धारेवर धरले का?
आताच ही गर्जना म्हणावी की कोल्हे कुई? विधानसभा आली की अश्या “कोल्हे कुई” खूप ऐकायला मिळतील हे जनमानसात चर्चेचा विषय आहे खरे आणि खोटे काय हे जनतेला ठाऊकच आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button