आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याच ते कार्ट
अमळनेर नगरपरिषदेचा भेदभाव
अमळनेर येथे नगरपरिषदेकडून भेदभाव केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. गावात बॅनर लावण्यास मनाई आणि नियम असतानाही राजकीय लोक आणि सामान्य लोकांमध्ये नगरपरिषद भेदभाव करीत आहे.सर्वसामान्य लोकांना बॅनर लावण्यासाठी ते किती दिवस ठेवायचे त्याचे अतिरिक्त भाडे इ नियम लागू केले जातात आणि अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जाते परंतु हा नियम मात्र राजकीय लोकांना लागू असलेला दिसून येत नाही किंवा अधिकारी कर्मचारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत असे वाटते.दि 7 तारखेच्या वाढदिवसाचे बॅनर आजही सम्पूर्ण शहरात असून याबाबत नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. किती दिवसांसाठी आरक्षित केल्या आहेत जागा याचीही माहिती द्यावी तरी त्वरित योग्य त्या कार्यवाहीसह हे बॅनर उतरवून शहर सुंदर ,बॅनर मुक्त शहर आणि स्वच्छ बनविण्यासाठी जो नारा पदसिद्ध प्रतिनिधींनी लावला आहे त्याला न्याय दयावा.अन्यथा *आपला तो बाळ्या आणि दुसऱ्या च ते कार्ट असा भेदभाव नको*







