Maharashtra

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अमळनेर तालुक्यात भव्य 5 कोटींचे क्रीडा संकुल उभारणार-आ.शिरीष चौधरी विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त शोभायात्रा व कार्यक्रम उत्साहात

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अमळनेर तालुक्यात भव्य 5 कोटींचे क्रीडा संकुल उभारणार-आ.शिरीष चौधरी

विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त शोभायात्रा व कार्यक्रम उत्साहात

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अमळनेर तालुक्यात भव्य 5 कोटींचे क्रीडा संकुल उभारणार-आ.शिरीष चौधरी विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त शोभायात्रा व कार्यक्रम उत्साहात

अमळनेर
शारीरिक दृष्ट्या मजबूत व खेळात चपळ असलेला आदिवासी विद्यार्थी मैदानी खेळाकडे वळून क्रीडा जगतात तो चमकावा व यशस्वी व्हावा यासाठी अमळनेर तालुक्यात सुमारे 5 कोटीचे क्रीडा संकुल उभारण्यात येणार येईल,व आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध कटिबद्ध राहील अशी ग्वाही आ शिरीष चौधरी यांनी विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी दिली.    

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अमळनेर तालुक्यात भव्य 5 कोटींचे क्रीडा संकुल उभारणार-आ.शिरीष चौधरी विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त शोभायात्रा व कार्यक्रम उत्साहात
               विविध आदिवासी संघटनांच्या वतीने भव्य शोभायात्रा व विशेष कार्यक्रमाचे आयोजन खाटेश्वर भिलाटी बहादरपूर,अमळनेर येथे करण्यात आले होते,शोभायात्रेपूर्वी आयोजित कार्यक्रमात आ चौधरी यांनी अमळनेर तालुक्यात आदिवासी बांधवांसाठी 1कोटी 35 लाख निधीतून सांस्कृतिक भवन मंजूर झाले असून लवकरच त्याचे काम सुरू होण्याचे संकेत दिलेत तर ग्रामीण भागात 55 देवमढि चे काम प्रगतीपथावर सांगितले.तसेच आदिवासी युवा शक्तिचे तालुका अध्यक्ष महेंद्र पवार यांनी आदिवासी बांधवांना आ शिरीषदादा चौधरी यांनी नेहमी न्याय देण्याचे कार्य केले आहे,यामुळे संपूर्ण आदिवासी बांधव त्यांच्यासोबत सोबत खंबीर असल्याचे सांगितले.याप्रसंगी गटनेते प्रवीण पाठक, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, आदिवासी एकता संघर्ष समिती च्या प्रदेशाध्यक्षा प्रा जयश्री साळुंके, आदिवासी युवा शक्ती तालुका अध्यक्ष महेंद्र पवार,सरपंच हिंगोने सुनील सोनवणे, आदिवासी एकता परिषद जिल्हाध्यक्ष आनंद पवार,तालुकाध्यक्ष रमेश भिल,
मा नगरसेवक कैलास भिल, विश्वास सोनवणे,महेंद्र सोनवणे, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
              कार्यक्रमानंतर खाटेश्वर भिलाटी बहादरपूर रोड पासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत देखील आ चौधरींनी सहभाग घेतल्याने आदिवासी बांधव उत्साहित झाले.शोभायात्रा  पाचपावली,बसस्थानक मार्गे, महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे समारोप करण्यात आला. या भव्य शोभायात्रा संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक कलाही सादर केल्यात.तसेच आदिवासी लोकनृत्य कला पथक ढोल पावरी व आदिवासी कलाकार  व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी ज्या दिनदर्शिकामध्ये जागतिक आदिवासी दिनाचा उल्लेख नाही असे अशा दिनदर्शिकाची होळी करण्यात आली.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अमळनेर तालुक्यात भव्य 5 कोटींचे क्रीडा संकुल उभारणार-आ.शिरीष चौधरी विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त शोभायात्रा व कार्यक्रम उत्साहात

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button