आदिवासी तडवी भिल समाजाने केला निर्धार
प्रतिनिधी मुबारक तडवी
जळगाव येथील वातावरण तापत चालले आहे.जसजशी आचारसंहितेची तारीख जवळ येत आहे तसा प्रत्येक समाज आपापली गणिते मांडत आहे. त्यामध्ये आदिवासी तडवी भिल्ल समाजाने सुद्धा आपले दंड थोपटले आहेत आणि तडवी समाजाचा आमदार यंदा मंत्रालयात पाठवण्याचा निर्धार केला आहे त्यासाठी मताची जुळवाजुळव चालू असून विजयाची 100% खात्री आहे म्हणून मतदान संघातील इतर समाजाने सुद्धा आदिवासी तडवी आमदार होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले जात आहे.
आदिवासी तडवी भिल समाज अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर एकवटला आहे त्याचे कारणही तसेच जातपडताळणी संदर्भात जळगाव मधील तडवी समाजाने पुणे येथे जातपडताळणी संशोधन कार्यालयात आमरण उपोषण करून प्रशासनाला सळो की पळो करून सोडले त्याचाच परिणाम म्हणजे नंदूरबार जातपडताळणी कार्यालय प्रमुख मॅडमची, प्रशासनाला तडकाफडकी बदली करावी लागली आहे, म्हणून समाजाचे मनोबल वाढलेले दिसून येते. संपूर्ण समाजाच्या वतीने समाजातील अॅडव्होकेट मा. याकूब तडवी, डाॅ. अमित तडवी, माजी अधिकारी यांच्या नावाची चाचपणी केली असता अॅडव्होकेट याकूब तडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे कारण संपूर्ण समाजाने वकील साहेबांना उभे राहण्यासाठी साकडे घातले आहे त्याच्याकडे समाजाचा उध्दार करण्याची क्षमता आहे एक अभ्यासू असे व्यक्तीमत्व आहे समाजात जाणता राजा म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे








