आय.एस ओ दर्जा प्राप्त श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन(पॉलिटेक्निक) कॉलेज मध्ये दिव्याखालीच अंधार
चोपडा – प्रतिनिधी सचिन जयस्वाल
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक), चोपडा ,जळगाव मधील कर्मचाऱ्याच्या थकीत वेतन व इतर प्रलंबित समस्यानी गंभीर स्वरूप धारण केले असून या बाबत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या टॅप नॅप संघटने च्या माध्यमातून आवाज उठवून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी शिवाजी चौक, चोपडा येथे लोकशाही मार्गाने हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे.आज आंदोलनाचा दुसरा शनिवार आहे.
कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दिले गेलेले वेतन देखील नियमित व शासकीय नियमानुसार नाही. मनमानी पद्धतीने कर्मचाऱ्याच्या वेतनात कपात करून यापूर्वी कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीनें सेल्फ चे चेक घेऊन त्याद्वारे कर्मचाऱ्याच्या पगारातील काही रक्कम संस्थेचे लेखापाल संस्था प्रशासन व प्राचार्य याच्या आदेशानुसार एचडीएफसी या खासगी बँकेतून काढून घेत असत. ज्या कर्मचाऱ्यानी सेल्फ चा चेक देण्यास विरोध केला त्याच्या वेतनातून बेकायदेशीर रित्या ऍडव्हान्स दाखवून रक्कम कपात केली गेली . त्यांना नोकरीतुन कमी करण्या बाबतीत धमकावले गेले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण होऊन कर्मचाऱ्यां वर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच तंत्रनिकेतन मध्ये खोटा स्टाफ दाखवून कर्मचाऱ्यांच्या वेताना वरील खर्च खोट्या पद्धतीने शासनाच्या शिक्षण शुल्क समितीला सादर करून फी शुल्कात वाढ करून शासनाची व विदयार्थी आणि पालकांची देखील संस्थेने दिशाभूल करून फसवणूक केलेली आहे.अशा पद्धतीचा कारभार गेल्या ६ ते ७ वर्षांपासून सुरु होता.
या संबंधीचे निवेदन कर्मचाऱ्यांनी मुखमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,पालक मंत्री,एआयसीटीई दिल्ली, डिटीई मुंबई, जॉईंट डायरेक्टर नासिक, एमएसबीटीई मुंबई, जिल्हाधिकारी जळगाव याना दिले आहे तसेच यासंबंदी कर्मचाऱ्यांनी मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात देखील याचिका दाखल केली आहे म्हणून याचा राग येऊन या कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने खोटे मेमो दिले जात आहेत,बेकायदेशीर बडतर्फी करून मानसिक त्रास दिला जात आहे असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
यासंबंधी कर्मचाऱ्यांच्या निवेदनाची दखल घेऊन तंत्रशिक्षण परिषद व एमएसबीटीई मुंबई यांनी संस्थेला लेखी विचारणा करून मुदतीच्या आत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासंबधीचे आदेशाचे पत्र दिले होते परंतु प्राचार्य व संस्था प्रशासनाने त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले म्हणून एमएसबीटीई ने संस्थेवर अँक्शन घेऊन प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रकिया थांबवली. अशा पद्धतीने संस्था प्रशासन व प्राचार्य यांच्या आडमुठे धोरणामुळे तंत्रनिकतेचं च्या ६० कर्मचाऱ्याचे संसार उद्धवस्थ होण्याची वेळ आली आहे.







