अमळनेर नगरपरिषदेतील भंगार चोरले की विकले….
अमळनेर नागरपरिषदेतील आरोग्य विभागाच्या आवारातून विविध लोखंडी वस्तू,दरवाजे ,फवारणी करण्याचे पंप,साने गुरुजी शाळे समोरील अतिक्रमण काढताना निघालेले चार पाच शटर,50 लिटर क्षमतेचे सुमारे 50 ते 60 डस्तबिन ,इ साहित्य चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे.चोरी गेलेल्या एकूण साहित्याची रक्कम साधारण पणे 60 ते 70 रु एवढी आहे .या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.एका प्रशासकीय इमारतीच्या आवारातून सराईत पणे चोरी होणे आश्चर्यकारक असून नगरपालिकेच्या “आतील” कोणाचा हात असल्याशिवाय एवढी मोठी चोरी करणे शक्य नाही. नगरपरिषदेतील हे “चोर “कोण आहेत अशी चर्चा सुरू आहे. कोणाचा “वरदहस्त”असल्याशिवाय एवढी मोठी “चोरी”होणे शक्य नाही. की ही चोरी नसून भंगार चे वरील साहित्य संगनमत करून विकून तर टाकले नाही?असा प्रश्न ही नागरिकांना पडला आहे.पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणे वै केवळ देखावा असल्याचे बोलले जात आहे. *तू राडल्यासारखं कर मी मारल्या सारख करतो* अशी बनवाबनवी तर केली जात नाही ना असाही प्रश्न आहे. या सर्व प्रकरणात मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी,आरोग्य विभागाचे निरीक्षक, इतर कर्मचारी समाविष्ट असण्याची शंका उपस्थित केली जात आहे.







