पंढरपूर

जुबेर हमीद बागवान संस्थापक/अध्यक्ष खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य

जुबेर हमीद बागवान
संस्थापक/अध्यक्ष खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य

प्रतिनिधी
(रफिक आतार)

पंढरीतील – खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य* च्या वतीने आज पुण्यातील CAA व NRC विरोधातील रॅलीस जाहीर पाठिंबा देण्यात आला ।
खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य* संस्थापक अध्यक्ष मा जुबेर हमीद बागवान यांनी आज पुण्यातील गोळीबार मैदानात या रॅलीस जाहीर पाठिंभा देत ” गो बॅक NRC ” गो बॅक CAA चा नारा दिला , भारत माता की जय , संविधान जिंदाबाद , छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर ,हाजरत टिपु सुलतान जिंदाबाद चा जय घोष करताना श्री जुबेर हमीद बागवान यांनी सांगितले की देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फज्जा उडवत केंद्र सरकारने संविधानाची पायमल्ली करत लोकशाहीची विडंबना केली आहे , आता देशातील नागरिक जागरूक झाला आहे , बेरोजगारी , महागाई यावर सरकार पडदा टाकण्यासाठी NRC CAA असे विषय पुढे करत नागरिकांना वेठीस धरत आहेत या कृती चा आम्ही खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट आणि कुल जमाते तंजीम पुणे धिक्कार करत आज शांतता पूर्वक आंदोलन केले आहे , सदर वेळेस खिदमत चॅरिटेबल ट्रस्टचे पुणे शहर युवक अध्यक्ष सर्फराज शेख , हमीद शेख , हनिफ भाई , रितेश भाऊ,संतोष राऊत,आशपाक बागवान,शारुख (बब्बु) बागवान, दिपक आंदले , आकाश,आदी सर्व धर्मिय उपस्तीत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button