Pune

जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी लुटला पावनखिंड चित्रपटाचा आनंद

जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी लुटला पावनखिंड चित्रपटाचा आनंद

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: इंदापूर तालुक्यातील वनगळी पारेकर वस्ती येथील विद्यार्थ्यांनी इंदापूर येथील राहुल चित्रपटगृहात जाऊन पावनखिंड या चित्रपटाचा आनंद लुटला पारेकर वस्ती येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष घोडके सर व सहशिक्षिका सविता पवार मॅडम यांनी मुलांना महाराष्ट्रातील शिवकालीन इतिहास इतिहासाबद्दल माहिती व्हावी यासाठी हा चित्रपट दाखवण्याचे ठरवले व पालकांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
श्री संतोष घोडके सर यांच्या वतीने मुलांना अल्पोपहार देण्यात आला व मुलांना चित्रपटगृहा पर्यंत सोडणे व नंतर शाळेत यांची व्यवस्था श्री रघुनाथ महादेव पारेकर यांनी केले चित्रपट पाहिल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पालकांनीही हि संधी मुलांना उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button