Nandurbar

जिल्हा परिषद शाळेत घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखने ठोकल्या बेड्या, ३ लाख ७२ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत

जिल्हा परिषद शाळेत घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखने ठोकल्या बेड्या, ३ लाख ७२ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत

फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक मा. श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची सूत्रे हातात घेतल्यानंतर ना उघड मालमत्तेच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळेचे कुलुप तोडुन इनव्हर्टर, बॅटरी व LED TV चोरीचे गुन्हे दाखल असुन गुन्हे अद्यापही उघडकिस आलेले नाहीत तसेच चोरी झालेल्या जिल्हा परिषद शाळेमधील चोरीची पध्दत ही एकच असुन चोरी करणारी टोळी देखील एकच असलेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री पी. आर पाटील मा. अपर पोलीस अधीक्षक श्री विजय पवार यांनी याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविद्र कळमकर यांचेशी या गुन्ह्यांबाबत सविस्तर चर्चा करून अचुक असे मार्गदर्शन करुन जिल्हा परिषद शाळेतील घरफोडीच्या गुन्ह्यांमधील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणबाबत मा पोलीस अधिक्षक श्री पी. आर पाटील यांनी निर्देश दिले.

वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत जिल्हा परिषद शाळेमधील चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करून चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस यांची इथंभूत माहिती घेवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला सुचना दिल्या.

दिनांक 23/09/2021 रोजी पहाटे पहाटे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविद्र कळमकर यांना चिरडे ता. शहादा गावात एक इसम कमी किमतीत व विना बिल पावती इनव्हर्टर व बॅटरी विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन चिरडे येथ खात्री करून पुढील कारवाई करणेसाठी पाठविले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चिरडे ता. शहादा येथे जावून वेशांतर करून कोणासही संशय येणार नाही असा सापळा रचुन संशयीत इसमास इनव्हर्टर ब बॅटरीसह ताब्यात घेतले. सदर इसमाने त्याचे नाव सोमनाथ ऊर्फ सोमा काशिनाथ दशरथ वय-21 रा. सुलवाडे ता शहादा जि. नंदुरबार असे सांगितले त्यास विश्वासात घेवून विचारपुस करता त्याने ) अजय आंबालाल मोरे वय-21 रा. सुलवाडे ता. शहादा 2) अजय ऊर्फ टाईगर राजु पावरा वय-22 रा ब्राम्हणपुरी ता. शहादा यांचे व सुलवाडे व ब्राम्हणपुरी या गावातील तसेच इतर साथीदारांच्या मदतीने नंदुरबार जिल्ह्यातील खालील ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले आहे.

1) जिल्हा परिषद शाळा, जवखेडा ता. शहादा

2) जिल्हा परिषद शाळा, पिप्री ता, शहादा

3) जिल्हा परिषद शाळा, गोगापुर ता, शहादा

4) जिल्हा परिषद शाळा, होळ मोहिदा ता. शहादा

(5) जिल्हा परिषद शाळा, तिखोरा ता. शहादा

(6) जिल्हा परिषद शाळा, परिवर्धा ता शहादा 7) जिल्हा परिषद शाळा, सावखेडा ता. शहादा

8) जिल्हा परिषद शाळा गोदीपुर ता शहादा 9) जिल्हा परिषद शाळा, मादे ता शहादा

10) जिल्हा परिषद शाळा, पाडळदा ता. शहादा

11) जिल्हा परिषद शाळा, डामरखेडा ता शहादा 12) ग्राम पंचायत कार्यालय, सावखेडा ता. शहादा

13) तिखोरा येथील मंदीर चोरी ता, शहादा 14) ब्राम्हणपुरी येथील तेलाच्या टाक्या चोरी ता. शहादा

15) शेतको विद्यालय, कळंबु ता शहादा 16) टवळाई ता. शहादा येथील अॅल्युमिनीयम तार चोरी

17) रायखेड ता शहादा येथील टायर चोरी 18) जिल्हा परिषद शाळा, काथदें ता शहादा

हे गुन्हे केल्याची कबुली दिली तसेच वर नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेले वस्तुपैकी ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपीतांकडुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विविध कंपनीचे एकुण 09 ल्युमिनस, एक्साईड, मायक्रोटेक कंपणीचे इनव्हर्टर, 09 एक्साईड बॅटरी, 02 TCL कंपणीचे LED TV, 02 इन्टेक्स कंपणीचे होम थेटर, 01 Acer कंपणीचे LCD मॉनिटर, 01 फॉर्म्युनर कंपणीचा स्टँड फॅन व गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण 3 लाख 72 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम चालु आहे.

• ताब्यात घेण्यात आलेल्या 09 ल्युमिनस एक्साईड मायक्रोटेक कंपणीचे इनव्हर्टर, 09 एक्साईड बॅटरी, 02 TCL कंपणीचे LED TV, 02 इन्टेक्स कंपणीचे होम थेटर, 01 Acer कंपणीचे LCD मॉनिटर, फॉर्च्यूनर कंपणीचा 01 स्टैंड फॅन बाबत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे येथे दाखल असलेले 16, सारंगखेडा येथील 01. म्हसावद येथील 01 असे एकुण 18 घरफोडीचे गुन्हे उघडकिस आलेले आहेत. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणी झालेले घरफोडीचे गुन्हे देखील उघडकीस येतील. असे मा. पोलीस अधीक्षक श्री पी. आर. पाटील यांनी कळविले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. पी आर पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविद्र कळमकर, पोलीस नाईक गोपाल चौधरी, जितेंद्र अहिरराव, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण, सतिष घुले यांचे पथकाने केली असुन मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button