Amalner

अमळनेर येथे पेट्रोल,गॅस च्या दरवाढीच्या निषेधार्थ युवा सेनेचे सायकल रॅली काढून आंदोलन

पेट्रोल,गॅस च्या दरवाढीच्या निषेधार्थ युवा सेनेचे सायकल रॅली काढून आंदोलन

अमळनेर : केंद्रशासनाच्या पेट्रोल ,डिझेल ,गॅस दरवाढीच्या विरोधात ऐन दिवाळीत युवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येऊन सायकल रॅली काढण्यात आली.
युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करून केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पुतळ्यापासून मंगलमूर्ती चौक , महाराणा प्रताप चौक , तहसील कार्यालय अशी सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी अनंत निकम , उमेश अंधारे युवा सेना शहर प्रमुख अमर पाटील ,वाहतुक सेना तालुका प्रमुख शेखर पाटील,
मयूर पाटील, युवती सेना तालुका प्रमुख जयश्री बैसाणे,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button