Mumbai

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवा मिशन स्वास्थ्य लसीकरण मोहीम..! आरोग्य मंत्री  राजेश टोपे

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवा मिशन स्वास्थ्य लसीकरण मोहीम..! आरोग्य मंत्री राजेश टोपेमुंबई राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य राबविणेबाबत आज मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.श्री.राजेशभैय्या टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.दिनांक 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत
राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य सार्वजनिक आरोग्य विभाग,उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येणार आहे.या बैठकीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदयजी सामंत,पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे व्हिसीद्वारे सहभागी झाले.यावेळी अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, अभियान संचालक डॉ. सतीश पवार, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, सहसंचालक प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. सोनाली रोडे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व्हिसीव्दारे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button