Faijpur

जिल्हा स्तरीय ‘बॉडी बिल्डर’ स्पर्धेत फैजपूर येथील युवक विजयी

जिल्हा स्तरीय ‘बॉडी बिल्डर’ स्पर्धेत फैजपूर येथील युवक विजयी

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

फैजपूर । प्रतिनिधी, भुसावळ येथे जिल्हा स्तरीय बॉडी बिल्डर स्पर्धा ‘व्हीनस क्लासिक २०२१’ तर्फे घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील बॉडी बिल्डर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत फैजपूर येथील शेख आसिफ (टॉप ५) व शेख मूस्ताक (टॉप १०) विजयी झाले आहे. ते फिरोज पटेल (इगले जिम, सावदा) येथील विद्यार्थी आहे.
यावेळी फैजपूर येथील नगरसेवक शेख कुर्बान हे बिल्डर यांचे मनोबल वाढविण्यासाठी स्वतः स्पध्रे ठिकाणी हजर होते समाजसेवक शेख फारुख अब्दुल्ला यांच्या हस्ते विजयी युवकांचा सत्कार करण्यात आला. सत्काराप्रसंगी कामील सर, वाजीद खातिक, अभियंता शेख मोहसिन, शाहिद कुरेशी, ऐजाज अहमद, शाहेबाज, मुजम्मिल रेहमान,सुलतान शैख, बबलू, नईम मनियार, तौसीफ बागवान, रफीक मिस्त्री आदीसह आदींनी अभिनंदन केले आहे वरील मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत विजयी झालेल्या युवकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button