Nashik

बेलगाव कुर्हे येथील युवकाचे उदयापासुन नाशिक तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण,

बेलगाव कुर्हे येथील युवकाचे उदयापासुन नाशिक तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण

उत्खनन माफिया विरुद्ध लढाई

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक=नाशिक शहराजवळील विल्होळी-सारुळ हा परिसर अवैध उत्खननासाठी अत्यंत कुप्रसिद्ध असुन येथील उत्खनन माफिया विरोधात ईगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुर्हे येथील एका सामान्य युवकाने आवाज उठवत संघर्ष सुरू केला आहे.
उदया सोमवार दि.१७ जानेवारी पासुन या युवकाचे नाशिक तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू होत आहे.
विल्होळी-सारुळ परिसरात स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या वरदहस्ताने सर्व शासकीय नियम गुंडाळून मोठ्या प्रमाणात डोंगर उत्खनन सुरु आहे. यातून मोठ मोठी कंन्स्ट्रक्शन कंपन्या अस्तित्वात आलेल्या असुन कोट्यवधी रुपयांची उलाढाल या धंद्यात सुरु आहे. चटावलेले उत्खनन माफिया पैशाच्या बळावर शासकीय यंत्रणेला विकत घेण्याची भाषा बोलत कुणालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. यातून पर्यावरणाची मात्र प्रचंड हानी होत असुन या विरुद्ध आवाज उठवणार्या ना हर प्रकारे त्रास दिला जातो आहे.
या सर्व अप प्रव्रूत्तीच्या विरोधात ईगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुर्हे येथील दत्तात्रय गुळवे हा युवक उदयापासुन नाशिक तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button